Aararara Khatarnak On Zee Talkies | छोट्या पडद्यावर 'अररारा खतरनाक' कार्यक्रम रसिकांच्या भेटीला !
छोट्या पडद्यावर 'अररारा खतरनाक' कार्यक्रम रसिकांच्या भेटीला !

झी टॉकीज गेली दहा वर्षे अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळेच आज ही वाहिनी सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षकांचे लाडके चित्रपट व मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, यांचा यात महत्त्वाचा वाटा आहे. असाच एक धमाकेदार सोहळा येत्या रविवारी, म्हणजेच १७ मार्च ला, झी टॉकीज घेऊन येत आहे. कोल्हापूर मध्ये सिने कलाकारांनी रंगवलेली मनोरंजनाची संध्याकाळ, 'अरारारा खतरनाक' या नावाने झी टॉकीज वर पहायला मिळेल.  अभिनेता, कवी व उत्तम सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे आणि विनोदी अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी या कार्यक्रमाचे अतिशय रंगतदार पद्धतीने सूत्रसंचालन केले आहे. हा कार्यक्रम, रविवारी १७ मार्च ला दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता, झी टॉकीजवर पाहता येईल.

 

विविध विषयांवर आधारित विनोदी स्कीट्स, सौंदर्यवतींचे नखरेदार नृत्य, अशा अनेक सादरीकरणांचा या कार्यक्रमात समावेश आहे.  संस्कृती बालगुडे, मानसी नाईक, स्मिता गोंदकर नेहा खान या तरुण नृत्यांगना आपली नृत्ये सादर करतील. सौंदर्य कसे असावे असं विचारल्यावर ज्या मराठी अभिनेत्रींची नावे येतात त्या म्हणजे किशोरी शहाणे, वर्षा उसगावकर या अभिनेत्री सुद्धा स्टेजवर थिरकताना दिसतील. त्यांच्या नृत्यातील अदा, समोर असणाऱ्या प्रेक्षकांना बेभान करतील यात वादच नाही.  आपली जागा सोडून, स्टेजजवळ येऊन डान्स परफॉर्मन्सला दाद देत असलेले प्रेक्षकदेखील या सोहळ्यात पाहायला मिळतील. महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता स्वप्नील जोशी याने सुद्धा श्रेया बुगडे हिच्याबरोबर एका रोमँटिक गाण्यावर ताल धरली.

 

विनोदी सादरीकरणाची जबाबदारी, सुप्रिया पाठारे, कमलाकर सातपुते, सुहास परांजपे, दिगंबर नाईक, संतोष पवार, ओंकार भोजने अशा दिग्गज मंडळींनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. विनोदाचा प्रत्येक आविष्कार, प्रेक्षकांना मनमुरादपणे हसण्याची संधी देईल. या विनोदवीरांची ही 'खतरनाक' जुगलबंदी पाहण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे.

'आरारारा खतरनाक' हे नाव सार्थ ठरवणारा हा धमाकेदार कार्यक्रम मनोरंजनाचा फार मोठा खजिना ठरणार आहे. म्हणूनच हा खतरनाक सोहळा पाहायला विसरू नका, रविवार १७ मार्च रोजी, दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता, फक्त आपल्या लाडक्या झी टॉकीजवर!! झी टॉकीज वाहिनी बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ' झी फैमिली पॅक' नक्की निवडा. या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील.

 
 

English summary :
Aararara Khatarnak show will be broadcast on Zee Talkies. Actor, poet sankarshan karhade and comedian Shreya Bugde organized the program. This event can be seen on Zee Talkies on Sunday 17 March at 12 noon and at 7 pm.


Web Title: Aararara Khatarnak On Zee Talkies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.