विकासाला खीळ घालणाºया काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारले

By appasaheb.patil | Published: May 23, 2019 07:20 PM2019-05-23T19:20:22+5:302019-05-23T19:22:57+5:30

सहकारमंत्री सुभाष देशमुख याची प्रतिक्रिया; पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे कार्य मतदारांना भावले

The voters rejected Congress-NCP's bid to bend the development | विकासाला खीळ घालणाºया काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारले

विकासाला खीळ घालणाºया काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी नाकारले

Next
ठळक मुद्दे- सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी- दोन्ही विजयी उमेदवारांना सहकारमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या- शहरात ठिकठिकाणी भाजप- शिवसेनेकडून जल्लोष

सोलापूर : वषार्नुवर्षे विकासाला खीळ घालणाºया काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला नाकारल्याचे दिसून येते. माढा आणि सोलापूर मतदारसंघात जनतेने विकास, देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेला दिलेला हा कौल असून, हा विजय जनतेचा आणि खºया अर्थाने भाजप, शिवसेना मित्रपक्ष कार्यकर्त्याचा विजय असल्याचं मत राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी व माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर याच्या विजयानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी जल्लोष करून विजयी उमेदवारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या़ त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, मागील पाच वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम सर्वसामान्य जनतेसह ग्रामीण भागातील जनतेला भावले आहे़  शेतकरी, कामगार, शेतमजुरांबरोबरच नोकरदारांसाठीही पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची ही पोच पावती आहे. भाजप, शिवसेना मित्रपक्ष महायुतीला पाठिंबा देऊन जनतेने विकासाला साथ दिला असल्याचे त्यांनी सांगितले़ यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महापौर शोभा बनशेट्टी, शिवसेनेचे लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शिवाजीराव सावंत, महेश कोठे आदी भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.




 

Web Title: The voters rejected Congress-NCP's bid to bend the development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.