राजकारण वेगळे; आमची मैत्री राहील : रणजितसिंह नाईक -निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:06 PM2019-05-24T12:06:00+5:302019-05-24T12:07:20+5:30

राज्यातच नव्हे संपूर्ण देशात चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवाराचा विजय

Politics differs; Our friendship will be: Ranjeet Singh Naik - Nimbalkar | राजकारण वेगळे; आमची मैत्री राहील : रणजितसिंह नाईक -निंबाळकर

राजकारण वेगळे; आमची मैत्री राहील : रणजितसिंह नाईक -निंबाळकर

googlenewsNext
ठळक मुद्दे- भाजपने माढा मतदारसंघात केलेले बेरजेचे व्यापक राजकारण- मोहिते-पाटलांचा भाजप प्रवेश अन् मतदारसंघात निंबाळकर यांना दिलेले बळ - नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सभा; चंद्रकांतदादांचा थेट संपर्क

सोलापूर: माढा लोकसभा मतदार संघात दोन मित्रांची लढत झाली. त्यात एका मित्राचा पराभव झाला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे व भाजपचे उमेदवार रणजीत नाईक निंबाळकर यांच्या मैत्रीची राजकारणात बरीच चर्चा झाली. आता निवडणुकीतील त्यांच्या संबंधावर विजयी उमेदवार व फलटणचे सुपुत्र रणजीत नाईक —निंबाळकर यांच्याशी साधलेला हा संवाद. 

प्रश्न : तुमच्या विजयाचे श्रेय कोणाला द्याल ?
उत्तर : ही निवडणूक यशस्वी होण्याचे श्रेय माझ्या सर्व मित्रांना व मतदारांना आहे. त्यांच्या पाठबळामुळेच तर मला जिंकता आले. विकासाच्या मुद्द्यावर मी भर दिला. लोकांच्या मनातले प्रश्न मांडले. त्याला सर्वांनी साथ दिल्याचे दिसून येत आहे. 

प्रश्न : निवडणूक प्रचाराविषयी काय सांगाल ?
प्रचारात आलेला अनुभव वाईट आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका झाली. टीका करणाºयांनी तारताम्य बाळगायला हवे. टीकेला लोकांनी नाकारल्याचे दिसून येत आहे.

प्रश्न : मित्राशी लढत झाली, त्याबद्दल काय सांगाल ?
राजकारणात हार व जीत असते. ओघाच्या भरात जाऊन राजकीय टीका टिप्पण्णीचा सामाजिक कार्याशी संबंध लावून कोणी मनावर घेऊ  नये. आमची मैत्री ही मैत्रीच असेल.


 

Web Title: Politics differs; Our friendship will be: Ranjeet Singh Naik - Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.