जाणून घ्या... संजय शिंदे यांच्या पराभवाची कारणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:23 PM2019-05-24T12:23:19+5:302019-05-24T12:28:31+5:30

भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे याचा पराभव

Know ... the reasons for the defeat of Sanjay Shinde ... | जाणून घ्या... संजय शिंदे यांच्या पराभवाची कारणे...

जाणून घ्या... संजय शिंदे यांच्या पराभवाची कारणे...

googlenewsNext
ठळक मुद्देरणजितसिंहांना माळशिरस, माण-खटावने दिली साथसंजय शिंदेंना दिला मतदारांनी मोठा धक्कामाढा मतदारसंघात भाजप-शिवसेनेचा विजयोत्सव

सोलापूर : राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार व सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पराभव केला. संजय शिंदे याच्या पराभवाची काय आहेत कारणे जाणून घ्या...


ही आहेत संजय शिंदे यांच्या पराभवाची कारणे

  • - राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांची टीम शेवटपर्यंत विरोधात गेली.
  • - माण-खटाव, फलटण, माळशिरस तालुक्यातून फारशी साथ नाही.
  • - मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्र्यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत मतदारसंघाचे सूत्रे ताब्यात घेतली.
  • - मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघात मोट बांधून कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली.
  • - शरद पवार यांना पराभूत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी लावलेला जोर अडचणीचा ठरला.


निकाल हा जनतेचा कौल; पण साशंकता
हा निकाल म्हणजे जनतेचा कौल आहे का, याबद्दल मला साशंकता आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी एका तालुक्यातून एक लाखाचे मताधिक्य देऊ, असे जाहीर केले जाते. निकालातही त्याच पद्धतीने मताधिक्य दिसते. हा साशंकतेचा आणि संशोधनाचा विषय आहे. 
- संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस.

Web Title: Know ... the reasons for the defeat of Sanjay Shinde ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.