करमाळा, माळशिरस आणि फलटणमध्ये मतदानासाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:41 PM2019-04-23T12:41:03+5:302019-04-23T12:42:56+5:30

माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ पर्यंत २० टक्के मतदान

Karmala, Malshiras and Phaltan voted for voting | करमाळा, माळशिरस आणि फलटणमध्ये मतदानासाठी चुरस

करमाळा, माळशिरस आणि फलटणमध्ये मतदानासाठी चुरस

Next
ठळक मुद्दे- माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू- बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा- दिव्यांग मतदारासाठी प्रशासनाची विशेष यंत्रणा कार्यरत

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली़ करमाळा, माळशिरस आणि फलटण विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी सर्वाधिक चुरस पहायला मिळत आहे़ करमाळा विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ पर्यंत २०.६८, माळशिरस विधानसभा मतदारसंघात २०.४२ तर फलटण विधानसभा मतदारसंघात २०.६६ टक्के मतदान झाले.

माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १९.६४ टक्के मतदान झाले़ बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांनी मोठया रांगा लावत मतदानाची प्रक्रिया पार पाडली़ यंदाच्या लोकसभा मतदारसंघासाठी मतदारांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, माढा विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १९.८१ टक्के, सांगोला १८.३५ तर माण विधानसभा मतदारसंघात १७.९० टक्के मतदान झाले़ आतापर्यंत २ लाख ४१ हजार २६९ पुरूष तर १ लाख ३५ हजार ८१९ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.


 

Web Title: Karmala, Malshiras and Phaltan voted for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.