पतीसाठी गृहमंत्री, पित्यासाठी कन्या मैदानात!; रत्नागिरी-सिंधुदुर्गात नीलम राणे, रूची राऊत यांचा प्रचाराचा धडाका

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 30, 2024 04:12 PM2024-04-30T16:12:31+5:302024-04-30T16:13:18+5:30

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सध्या जोरात दणाणत आहेत. रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ...

Narayan Rane Wife Neelam and Vinayak Raut daughter are busy campaigning for in Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency | पतीसाठी गृहमंत्री, पित्यासाठी कन्या मैदानात!; रत्नागिरी-सिंधुदुर्गात नीलम राणे, रूची राऊत यांचा प्रचाराचा धडाका

पतीसाठी गृहमंत्री, पित्यासाठी कन्या मैदानात!; रत्नागिरी-सिंधुदुर्गात नीलम राणे, रूची राऊत यांचा प्रचाराचा धडाका

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सध्या जोरात दणाणत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी नीलम राणे त्यांना उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच म्हणजे ५ एप्रिलपासून जोरदार प्रचार रिंगणात उतरल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी त्यांचा मुलगा गितेश आणि मुलगी रूची प्रचारात उतरली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघामध्ये दुहेरी लढतीचे चित्र आहे. महायुतीकडून भाजपाचे नारायण राणे तर महाविकास आघाडीतून उद्धवसेनेचे विनायक राऊत यांच्यातच खरी लढत आहे. दोन्ही उमेदवारांसह कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीयदेखील या राजकीय आखाड्यात प्रचारासाठी उतरले आहेत.

गृहमंत्र्यांचा दहा दहा तास प्रचार

नीलम नारायण राणे :
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे गृहिणी आहेत. यापूर्वी निलेश राणे यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला आहे.  सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला पदाधिकाऱ्यांना घेऊन डोअर टू डोअर भेटी देत आहेत, मेळावे घेत आहेत. तसेच गावागावात फिरून महिलांशी संवाद साधत आहेत.

रूची विनायक राऊत:
खासदार विनायक राऊत यांची मुलगी रूची राऊत आणि मुलगा प्रितेश राऊत दोघेही प्रचारात मग्न आहेत. रूची राऊत या निवडणुकीच्या अगोदरपासूनच विविध ठिकाणी उध्दवसेनेच्या व्यासपीठावर दिसत होत्या.

Web Title: Narayan Rane Wife Neelam and Vinayak Raut daughter are busy campaigning for in Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.