महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते साताऱ्यात भ्रष्टाचाराचं रोपटं लावतात, उदयनराजेंची खरमरीत टीका 

By दीपक शिंदे | Published: April 24, 2024 04:55 PM2024-04-24T16:55:09+5:302024-04-24T16:56:10+5:30

'माझ्या हातात घड्याळ, गळ्यात कमळ आणि खांद्यावर धनुष्य'

Senior leaders of Maharashtra plant corruption in Satara, criticism of Udayanraj bhosle | महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते साताऱ्यात भ्रष्टाचाराचं रोपटं लावतात, उदयनराजेंची खरमरीत टीका 

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते साताऱ्यात भ्रष्टाचाराचं रोपटं लावतात, उदयनराजेंची खरमरीत टीका 

सातारा : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांचे माझ्यावर खूपच प्रेम आहे. मला विरोध करण्यासाठी ते जिल्ह्यात चार चार सभा घेणार आहेत. माझ्या विरोधात त्यांना इतक्या मोठ्या जिल्ह्यामध्ये एकही चारित्र्यसंपन्न उमेदवार मिळाला नाही, आता ते घोटाळ्याचे रोपटे जिल्ह्यात लावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खरमरीत टीका लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

सातारा येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या आजी-माजी नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीला लोकांसमोर जाऊन मते मागण्याची नैतिकता राहिली नाही. या पक्षाला जनतेने पाठिंबा दिला. त्या पाठिंब्याच्या बळावर देशाला ५० वर्षे मागे खेचण्याचे पाप या पक्षाने केले आहे. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करत असताना नैतिकता नसलेले लोक विरोधाला विरोध करत लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत.

विकासाच्या मुद्यावर कायमस्वरूपी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. २१ व्या शतकात मोठी स्पर्धा जास्तीत जास्त विकासकामांची झाली पाहिजे, त्यासाठी एकी महत्त्वाची आहे. वेळ गेली की पुन्हा ती येऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कामे मार्गी लागायची असतील तर स्थिरता अत्यंत गरजेची आहे.

माझ्या हातात घड्याळ, गळ्यात कमळ आणि खांद्यावर धनुष्य

जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचे. चुटकीसरशी सगळे प्रश्न सोडवण्याची हिंमत माझ्यात आहे. माझ्या गळ्यात कमळ आहे. हातात घड्याळ, तर खांद्यावर धनुष्यबाण आहे. त्यामुळे या सर्व महायुतीच्या ताकतीच्या जोरावर भविष्यात सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार निवडून येतील, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.

Web Title: Senior leaders of Maharashtra plant corruption in Satara, criticism of Udayanraj bhosle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.