नियमांचा भंग केल्यास कारवाई करूच : सुनील चव्हाण यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:58 PM2019-03-30T12:58:22+5:302019-03-30T13:07:31+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

Will take action if violation of rules: Sunil Chavan directives | नियमांचा भंग केल्यास कारवाई करूच : सुनील चव्हाण यांचे निर्देश

नियमांचा भंग केल्यास कारवाई करूच : सुनील चव्हाण यांचे निर्देश

Next
ठळक मुद्देनियमांचा भंग केल्यास कारवाई करूच : सुनील चव्हाण यांचे निर्देशकायद्याचे पालन करणाऱ्यांना सहकार्य करा

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासह केवळ पाच लोकांना प्रवेश असेल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उमेदवाराच्या वाहनासह इतर २ अशा केवळ तीनच वाहनांना प्रवेश देण्यात येईल, असे सांगितले.

निवडणुकीच्या काळात सर्वांनीच नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कायद्याचे पालन करणाऱ्या पोलिसांना सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

यावर्षीची निवडणूक ही अ‍ॅपची निवडणूक असून, दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. दिव्यांगांना मतदान केंद्रांपर्यंत नेणे व परत सोडण्याची व्यवस्था प्रशासन करणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी सी व्हिजिल हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपवरून आतापर्यंत ७ तक्रारी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते.

  1.  आतापर्यंत १९५४ शस्त्र जमा करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ३ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. अजूनही ११ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव आहेत. त्यावर दोन दिवसांत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत १०७ कलमानुसार ३४९, कलम १०९ अन्वये २७ आणि कलम ११० अन्वये ३८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
     
  2. निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी मैदान, रॅली, सभा, वाहने तसेच पोस्टर, बॅनर, बिल्ले यासंदर्भातील परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एक खिडकी सुरू करण्यात आली आहे. हे कार्यालय जुने तहसील कार्यालय येथे सुरू करण्यात आले असून, याठिकाणी नगरपरिषद, तहसील, परिवहन कार्यालय, गटविकास अधिकारी व पोलीस विभागाचे कर्मचारी असतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
     
  3. लोकसभा निवडणुकीसाठी महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्र ह्यसखी मतदान केंद्रह्ण म्हणून ओळखली जाणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Web Title: Will take action if violation of rules: Sunil Chavan directives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.