गेली दोन वर्षे आजारी, शिमगोत्सवासाठी हट्टाने आला गावी; पालखी घरातून जाताच घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 06:39 PM2022-03-23T18:39:59+5:302022-03-23T18:53:07+5:30

वडिलांच्या निधनाचा मानसिक धक्का नीलेश याला बसला आणि त्या दिवसापासून तो आजारी पडला. मुंबईला अनेक तपासण्या करण्यात आल्या. मात्र, आजार कोणता याचे निदान झालेले नाही.

Came to the village stubbornly for Shimgotsava; Nilesh Shivram Chowkekar passed away while passing through the palanquin house | गेली दोन वर्षे आजारी, शिमगोत्सवासाठी हट्टाने आला गावी; पालखी घरातून जाताच घेतला जगाचा निरोप

गेली दोन वर्षे आजारी, शिमगोत्सवासाठी हट्टाने आला गावी; पालखी घरातून जाताच घेतला जगाचा निरोप

googlenewsNext

राजापूर : गेली दोन वर्षे आजारी असतानाही गावच्या शिमग्याची ओढ, त्यामुळे तो शिमगोत्सवासाठी हट्ट करून गावी आला हाेता. गावी घरात आलेल्या पालखीचे दर्शन घेतले आणि पालखी घरातून गेल्यानंतर अवघ्या काही क्षणातच त्याने जगाचा निरोप घेतला. राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील नीलेश शिवराम चौकेकर या अवघ्या २० वर्षीय तरुणाच्या बाबतीत घडलेली ही दुर्दैवी घटना सर्वांच्या मनाला चटका लावून गेली.

तालुक्यातील सोल्ये माळवाडीतील शिवराम चौकेकर यांचे दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. वडिलांच्या निधनाचा मानसिक धक्का नीलेश याला बसला आणि त्या दिवसापासून तो आजारी पडला. मुंबईला अनेक तपासण्या करण्यात आल्या. मात्र, आजार कोणता याचे निदान झालेले नाही. गेली दोन वर्षे कोरोनामुळे शिमगोत्सव साजरा करण्यात आलेला नाही. यावर्षी शिमगोत्सव साजरा होणार असल्याने नीलेशने गावी येण्यासाठी आई व भावाकडे हट्ट धरला आणि ताे गावी आला हाेता.

सोल्येचा शिमगोत्सव सुरू झाल्यावर मानाची घरे घेत पालखी माळवाडी येथे गेली. दरम्यान, नीलेशची तब्बेत बिघडली होती. तरी त्याने हार न मानता घरात आलेल्या पालखीचे व देवीचे दर्शन घेतले. घरातील मंडळींनी देवीची पूजा करत ओटी भरली. गावकऱ्यांशी हसत खेळत असताना पालखी शेजारी असलेल्या घरी गेली. याचवेळी नीलेश याचा रक्तदाब अचानक कमी झाला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार आहे.

दर्शनाची इच्छा पूर्ण

नीलेशच्या मृत्यूची बातमी खेळगडी व गावात पसरताच पूर्ण गाव सुन्न झाला. दहा मिनिटांपूर्वी देवीचे दर्शन घेणाऱ्या नीलेशचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच चटका लावून गेला. नीलेशला शेवटचे देवीचे दर्शन घ्यायचे होते म्हणूनच त्याने हट्ट धरून गाव गाठले. त्याची इच्छा पूर्ण होताच त्याने आपला देह ठेवला.

Web Title: Came to the village stubbornly for Shimgotsava; Nilesh Shivram Chowkekar passed away while passing through the palanquin house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.