मतदार जनजागृतीसाठी अलिबागमध्ये बाईक रॅली संपन्न, प्रिझम संस्थेतर्फे पथनाट्य सादरीकरण

By राजेश भोस्तेकर | Published: April 10, 2024 10:26 AM2024-04-10T10:26:08+5:302024-04-10T10:26:48+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: उत्सव लोकशाहीचा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने बुधवारी १० मार्च रोजी सकाळी आठ वाजता अलिबाग शहरातून बाईक रॅली आणि मतदान जनजागृती पथनाट्यचे आयोजन अलिबाग नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले होते.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Bike rally held in Alibaug for voter awareness, street theater performance by Prism organization | मतदार जनजागृतीसाठी अलिबागमध्ये बाईक रॅली संपन्न, प्रिझम संस्थेतर्फे पथनाट्य सादरीकरण

मतदार जनजागृतीसाठी अलिबागमध्ये बाईक रॅली संपन्न, प्रिझम संस्थेतर्फे पथनाट्य सादरीकरण

अलिबाग - उत्सव लोकशाहीचा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने बुधवारी १० मार्च रोजी सकाळी आठ वाजता अलिबाग शहरातून बाईक रॅली आणि मतदान जनजागृती पथनाट्यचे आयोजन अलिबाग नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे आणि जिल्हा पोलिस अधिकारी सोमनाथ घार्गे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथून हिरवा झेंडा दाखवून बाईक रॅलीला सुरुवात झाली. यावेळी प्रिझम संस्थेतर्फे मतदार जनजागृतीपर पथनाट्य कलाकारांनी सादर केले. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, लायन्स क्लबचे सदस्य यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

३२ रायगड लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. ७ मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभागातर्फे विविध कार्यक्रम अंतर्गत मतदार जनजागृतीपर कार्यक्रम लोकसभा मतदार संघात घेतले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अलिबाग नगरपरिषद, लायन्स क्लब अलिबाग, तहसील कार्यालय मार्फत बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथून बाईक रॅलीला सुरुवात झाली. शहरात फिरून बाईक रॅली ची सांगता अलिबाग समुद्र किनारी झाली. या रॅलीत वाहतूक पोलीस, तहसील कार्यालय, नगरपालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यासह लायन्स क्लब सदस्य, नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Bike rally held in Alibaug for voter awareness, street theater performance by Prism organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.