सी-व्हिजिलद्वारे मतदारांमध्ये आचारसंहितेबाबत जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 02:36 AM2019-03-31T02:36:39+5:302019-03-31T02:37:02+5:30

सकारात्मक प्रतिसाद : मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर

 Awareness about Code of Conduct by voters in Citizen | सी-व्हिजिलद्वारे मतदारांमध्ये आचारसंहितेबाबत जागृती

सी-व्हिजिलद्वारे मतदारांमध्ये आचारसंहितेबाबत जागृती

Next

जयंत धुळप 

अलिबाग : भारत निवडणूक आयोगदेखील बदलत्या काळानुसार बदलत आहे. पहिली निवडणूक देशात झाली ती प्रदीर्घ काळ चालणारी होती. मात्र, काळानुरूप बदल झाल्याने प्रशासन आणि मतदार यांच्यासाठी ती सोपी झाली आहे. आता सोशल मीडियाच्या उदयानंतर होणारी यंदाची दुसरी लोकसभेची निवडणूक आहे. १३० कोटी लोकसंख्येच्या भारतात मोबाइलधारकांची संख्या ११० कोटींपेक्षा अधिक आहे. त्यातील सुमारे ६० टक्के लोक स्मार्टफोन वापरतात ही बाब विचारात घेऊन निवडणूक आयोगाने या स्मार्टफोन वापरणाऱ्या मतदारांनाच सिटिजन व्हिजिल अर्थात ‘सी-व्हिजिल’ या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आचारसंहिता अंमलबजावणीकरिता जागृत करण्यात येत आहे.

तंत्रज्ञानाने अवघड वाटणाऱ्या बाबी सोप्या आणि सहज शक्य केल्या आहेत. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणे आयोगाला अपेक्षित आहे आणि त्यासाठी मतदारांची सकारात्मक मानसिकता महत्त्वाची ठरते. सामान्यपणे निवडणूक यंत्रणा काम करताना सर्वच बाबींकडे लक्ष ठेवू शकतेच असे नाही. मात्र, निवडणूक काळात अधिक सजगपणे काम करण्याची यंत्रणेला सवय असते. मात्र, यात प्रत्यक्ष मतदारांना सहभागी होता यावे, यासाठी सी-व्हिजिल हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कुठे गैरव्यवहार होताना नागरिकांना आढळला तर त्यांना त्याबाबत फोटो किंवा एक-दोन मिनिटांच्या व्हिडीओसह तक्र ार या अ‍ॅपच्या माध्यमातून थेट निवडणूक आयोगाकडे करता येते. ही तक्र ार प्राप्त झाल्यानंतर ती संबंधित लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत जाते आणि त्या तक्रारीची खातरजमा करून केवळ १०० मिनिटांत कारवाई होते. याची प्रचिती रायगड लोकसभा मतदार संघातील आतापर्यंत आलेल्या ३६ तक्रारींच्या निराकरणांती आली आहे.

मतदारांची भूमिका महत्त्वाची
च्प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध असणारे हे सी-व्हिजिल अ‍ॅप सर्व सुजाण मतदारांनी आपल्या मोबाइलवर डाउनलोड करून, मतदार म्हणून केवळ भूमिका न बजावता पुढे जाऊन आपल्या लोकशाहीचा सजग प्रहारी बनावे, असे आवाहन रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
 

Web Title:  Awareness about Code of Conduct by voters in Citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.