Pune Lok Sabha Election: Girish Bapat and Mohan Joshi shared the right to vote for the family In Pune | पुणे लोकसभा निवडणूक: पुण्यात गिरीश बापट व मोहन जोशी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क 
पुणे लोकसभा निवडणूक: पुण्यात गिरीश बापट व मोहन जोशी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क 

ठळक मुद्देबारामती, मावळ , शिरुर, पुणे, लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांसाठी आज मतदान होत आहे यातील पुणे मतदारसंघासाठी काँग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी व महायुतीचे गिरीश बापट यांनी आपल्या कुटुंबासमवेत पुण्यात सकााळी सात ते आठच्या दरम्यान मतदान केले. मोहन जोशी व गिरीश बापट यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. पुण्याची लढत राज्यातील महत्वाच्या लढतींपैकी एक समजली जाते. तसेच बारामती, मावळ , शिरुर मतदारसंघासाठी देखील मंगळवारी मतदान होत आहे. एकूणच या सर्व लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. 


 लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यांत महाराष्ट्रातील सतरा जागांसाठी मतदान होत असून तसेच बारामती, मावळ , शिरुर, सातारा , माढा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर आदी जागांचा समावेश त्यात आहे. या सर्व लढती विविघ मुद्द्यांनी चर्चेत राहिल्या आहे.सकाळपासून शहरातील विविध मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदान करण्यासाठी लगबग सुरु केली होती. मोहन जोशी यांनी सॅलिसबरी पार्क येथे तर बापट यांनी शनिवार पेठेतील अहिल्या देवी शाळेत कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी सकाळी जोशी व बापट यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. 

महापालिका प्रशासनाकडून सर्व यंत्रणांनी कंबर कसलेली आहे. मतदानासाठी तसेच या लढतींमध्ये  काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांसह अनेक पक्षांचे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात पार्थ पवार, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव पाटील , मोहन जोशी , गिरीश बापट ,श्रींरग बारणे, आदी उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.  राज्यात सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी प्रचार सभांमध्ये आरोप चप्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या.


Web Title: Pune Lok Sabha Election: Girish Bapat and Mohan Joshi shared the right to vote for the family In Pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.