माढ्यातून माजी उपमुख्यमंत्र्यांचा काढता पाय : अजित पवार यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 08:10 PM2019-03-29T20:10:52+5:302019-03-29T20:11:29+5:30

माढा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यावर माजी उपमुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव या सगळ्यांनी काढता पाय घेतला असल्याची टीका अजित पवार यांनी पुण्यात केली

Ajit Pawar criticized former Deputy Chief Minister Vijay Sinh Mohite Patil | माढ्यातून माजी उपमुख्यमंत्र्यांचा काढता पाय : अजित पवार यांची टीका 

माढ्यातून माजी उपमुख्यमंत्र्यांचा काढता पाय : अजित पवार यांची टीका 

पुणे : माढा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यावर माजी उपमुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव या सगळ्यांनी काढता पाय घेतला असल्याची टीका अजित पवार यांनी पुण्यात केली.यावेळी त्यांनी नाव न घेताविजयसिंह मोहिते पाटील यांना टोला लगावला,  भाजपने माढ्यात रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यावर पवार यांनी हे मत व्यक्त केले. 

राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र उमेदवारीची माळ काँग्रेसमधून आलेल्या निंबाळकर यांच्या गळ्यात पडली आहे. त्यावर पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले की, भाजपच्या उमेदवारीच्या बातम्या रोज येत होत्या,मात्र तिथे सर्वांनी काढता पाय घेतला आहे. त्यात माजी कॅबिनेट मंत्री, माजी उपमुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव यांचाही समावेश आहे. तिथे आघाडी एकत्र येऊन काम करून जागा जिंकेल. 

 

---------------------

 

मतांचीी विभागणी टाळण्यासाठी रावेरची जागा काँग्रेसला 

राष्ट्रवादीने काँग्रेसला रावेर मतदारसंघाची जागा सोडल्यावर अजित पवार म्हणाले की, अनेक दिवसांपासून रावेरची  जागा सोडण्याची चर्चा सुरु होती.त्यावेळी पर्यायी मतसदारसंघाचाही विचार समोर आला. मात्र भाजप-सेनेसारख्या जातीयवादी पक्षाचा पराभव करण्याकरिता आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे मतांची विभागणी न होण्याकरिता हा निर्णय घेतला. 

Web Title: Ajit Pawar criticized former Deputy Chief Minister Vijay Sinh Mohite Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.