प्रचारात उतरलेय अवघे श्रीरंग बारणे यांचे कुटुंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:46 AM2019-04-24T00:46:51+5:302019-04-24T00:48:47+5:30

विजयासाठी सारेच करताहेत मेहनत

Shrirang Barane's family just went out in the campaign! | प्रचारात उतरलेय अवघे श्रीरंग बारणे यांचे कुटुंब!

प्रचारात उतरलेय अवघे श्रीरंग बारणे यांचे कुटुंब!

googlenewsNext

- विश्वास मोरे 

पिंपरी : लोकसभा निवडणुकांसाठी मावळ मतदारसंघातील खासदार श्रीरंग बारणे यांचे कुटुंब प्रचारात रंगले आहे. पत्नी, मुले, पुतणेही प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. मतदारांशी संवाद, बैठकांवर भर दिला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंग भरू लागली आहे. निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. खासदारांसह त्यांचे पुतणे महेश आणि नीलेश हे सक्रिय असून पत्नी सरिता या महिलांशी संवाद साधण्यावर भर देत आहेत. पिंपरी, चिंचवड आणि पनवेल या शहरी भागातील गृहनिर्माण सोसायट्या, सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था, मावळ, कर्जत, उरण हा ग्रामीण भाग पिंजून काढत आहेत. मुलगा विश्वजित, प्रताप हेही स्मार्ट सिटीतील तरूणाई यांच्या भेटीगाठींवर भर देत आहेत.

श्रीरंग बारणे । शिवसेना
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाचवेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. स्थायी समितीचे सभापती, विरोधीपक्षनेते, शहराध्यक्ष अशी विविध पदे भूषविली असून, खासदार म्हणून २०१४ ला निवडून आले होते.

पत्नी । सरिता
सामाजिक कार्यात कार्यरत असून, महिला बचत गट, महिलांच्या संस्था, यावर काम करीत असून शहरातील विविध सोसायट्या, रायगड परिसरातील आदिवासी पाडे, ग्रामीण भागात फिरून संवाद साधत आहेत.

मुलगा । विश्वजित
पदवीधर असून शिवसेना युवासेनेचे शहरप्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. शहरीभागातील महाविद्यालयीन युवकांचे प्रबोधन, मतदानाविषयी जागृती करण्याचे काम करीत आहेत.

पुतणे । महेश
राजकारणात नाहीत. उद्योजक आहेत. आयटीपार्क, मध्यमवर्गीय व्यावसायिकांशी संवाद साधणे, मेळाव्यांचे नियोजन करणे यावर भर देत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात काम सुरू आहे.

पुतणे । नीलेश
महापालिकेच्या राजकारणात नगरसेवक असून, थेरगाव परिसरातून दोन वेळा निवडून आले आहेत. पिंपरी, चिंचवड, पनवेल भागात संवाद साधणे, कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करीत आहेत.

Web Title: Shrirang Barane's family just went out in the campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.