मीरा-भाईंदरमध्ये मनसे आनंद परांजपेंच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:03 AM2019-04-26T01:03:41+5:302019-04-26T01:04:50+5:30

ठाणे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना मीरा-भाईंदरमध्ये साथ देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.

Mera Anand Paranjape in Mira-Bhayander | मीरा-भाईंदरमध्ये मनसे आनंद परांजपेंच्या पाठीशी

मीरा-भाईंदरमध्ये मनसे आनंद परांजपेंच्या पाठीशी

googlenewsNext

मीरा रोड : ठाणे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना मीरा-भाईंदरमध्ये साथ देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. परांजपे हे सुशिक्षित उमेदवार असल्याने ही भूमिका घेतल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. बुधवारी रात्री मीरा रोड येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला. याशिवाय, मनसेने मोदी व भाजपविरोधात चौकसभा घेण्यासही सुरुवात केली आहे.

मीरा रोडच्या मनसे शहर कार्यालयातील सभागृहात बुधवारी रात्री पदाधिकाºयांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास आनंद परांजपे यांच्यासह ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. मोदी-शहामुक्त भारताची हाक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देत राज्यभर विरोधाच्या सभा चालवल्या आहेत. कुठल्याही स्थितीत पुन्हा भाजप सत्तेवर येता कामा नये, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतल्याचे जाधव यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँगे्र्रस आघाडीला म्हणून नव्हे, तर आनंद परांजपे हे एक सुशिक्षित, चांगले, अनुभवी कार्यकर्ते असल्याने त्यांना मनसे साथ देणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

परांजपे यांनी विद्यमान खासदार राजन विचारे निष्क्रिय ठरले असून त्यांनी शहराचे प्रश्न सोडवले नसल्याचा आरोप केला. २७ एप्रिल रोजी परांजपे यांच्या प्रचारफेरीत मनसे सोबत असेल, असे शहराध्यक्ष सुर्वे म्हणाले. दुसरीकडे शहरात चौकसभा घेऊन मनसेने मोदी सरकारविरोधात टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. मीरा रोड स्थानकाबाहेर मोदींना सवाल करणारे फलक घेऊन मनसेने निदर्शने केली.

नोटाबंदी व जीएसटीमुळे उदध्वस्त उद्योग व रोजगार, वाढता भ्रष्टाचार, वाढते गॅस-पेट्रोल-डिझेलचे दर आदी मुद्यांवरून चौकसभांत मोदी आणि भाजपविरोधात टीकेची झोड उठवली जात आहे. भार्इंदर, मीरा रोड, काशिमीरा आदी ठिकाणी चौकसभा, प्रचारफेºया काढण्यात येणार आहेत.

Web Title: Mera Anand Paranjape in Mira-Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.