संपूर्ण पवार कुटुंबीयांचा मानसिक तोल ढासळला आहे : शिवतारेंची जहरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 03:57 PM2019-04-22T15:57:19+5:302019-04-22T16:00:01+5:30

अजित पवारांचाच नव्हे तर  संपूर्ण पवार कुटुंबियांचा मानसिक तोल ढासळला आहे अशा शब्दात त्यांनी पवार यांना उत्तर दिले आहे. त्यामुळे पवार विरुद्ध शिवतारे संघर्ष सुरु झाला आहे. 

The mental balance of the entire Pawar family has been stalled: Shivtare's criticism | संपूर्ण पवार कुटुंबीयांचा मानसिक तोल ढासळला आहे : शिवतारेंची जहरी टीका 

संपूर्ण पवार कुटुंबीयांचा मानसिक तोल ढासळला आहे : शिवतारेंची जहरी टीका 

Next

पुणे : विजय शिवतारे आता पोपटासाराखा बोलायला लागलाय. शिवतारे… तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो, असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी दिला असताना आता त्यांना शिवतारेंनीही त्याच शब्दांत उत्तर दिले आहे. अजित पवारांचाच नव्हे तर  संपूर्ण पवार कुटुंबियांचा मानसिक तोल ढासळला आहे अशा शब्दात त्यांनी पवार यांना उत्तर दिले आहे. त्यामुळे पवार विरुद्ध शिवतारे संघर्ष सुरु झाला आहे. 

                                                                                                                                                                                                                                     रविवारी बारामतीच्या आघाडीच्या  उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा बारामतीमध्ये  पार पडली. या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्यावर जोरदार टीका केली होती.एकदा ठरवलं की एखाद्याला नाहीच आमदार होऊन द्यायचं… तर तो नाहीच आमदार होत अशा भाषेत त्यांनी शिवतारेंना फटकारले होते. 

 भाजपा-शिवसेनेचे नेते पवार साहेबांनी काय केलं? अस विचारतात. पण, ते हे विचारण्यासाठी ज्या रस्त्यानं बारामतीत आले ते रस्तेसुद्धा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बारामतीकरांनी बांधले आहेत, हे लक्षात ठेवा! पवार साहेब म्हणजेच बारामती आणि बारामती म्हणजेच पवार साहेब म्हणून सारं जग बारामतीला ओळखतं, असेही पवार म्हणाले होते. आता त्यांना त्यांच्याच भाषेत शिवतारे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, पवार कुटुंबियांना इतिहासात कधीही नव्हता एवढा विरोध आता होऊ लागल्याने  फक्त अजित पवारचंं नव्हे तर संपूर्ण पवार कुटुंबियांचा मानसिक तोल ढासळला आहे. लोकशाहीमध्ये जनता आमदार कोण होणार आणि कोण नाही होणार ते हे ठरवते.त्यामुळे अजित पवार नव्हे तर मी आमदार होणार की नाही ते पुरंदर तालुक्यातील स्वाभिमानी जनता ठरवेल अशा भाषेत शिवतारे यांनीही प्रत्युत्तर देत आपली ताकद दाखवली आहे. 

Web Title: The mental balance of the entire Pawar family has been stalled: Shivtare's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.