CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रासह 'या' 8 राज्यांत आताही कोरोना ठरतोय जीवघेणा; परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:25 AM2021-07-06T10:25:15+5:302021-07-06T11:08:08+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे.

देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 111 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 34 हजार 703 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

मंगळवारी (6 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 34,703 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे.

रिकव्हरी रेट हा 97.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात सलग आठव्या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,64,357 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पंजाब, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसह देशाती 10 मोठ्या राज्यांमध्ये आता कोरोनाचा वेग कमी झाला आहे. मात्र काही राज्यांमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, पश्चिम बंगाल, मिझोरम, तेलंगणा, जम्मू कश्मीर आणि झारखंडमध्ये कोरोना अद्यापही जीवघेणा ठरत आहे. कोरोनामुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 61,04,917 पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 1,23,136 वर गेला आहे. सध्या 1,16,827 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून रिकव्हरी रेट 96.02 टक्के झाला आहे.

कर्नाटकमध्ये कोरोनाचे 28.56 लाख रुग्ण झाले आहेत. गेल्या 24 तासांत 67 रुग्णांचा मृत्यू झाला असून 35,434 जणांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. तर 27,79,038 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

आसाममध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2640 रुग्ण आढळून आले आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या ही 22243 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनामुळे 4683 लोकांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे 885 नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 15,06,279 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे 17,817 लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. 17,950 लोकांवर उपचार सुरू आहेत.

मिझोरमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 520 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण रुग्णांची संख्या 21854 वर पोहोचली आहे. 18026 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तेलंगणातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6,27,498 वर पोहोचली आहे. 3,698 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 6,12,096 जण कोरोनातून ठिक झाले असून 11 हजारांहून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 3,17,250 वर पोहोचली आहे. सहा लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांचा आकडा 4,343 वर पोहचला आहे. तसेच अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

छत्तीसगडमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 319 नवे रुग्णा आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांचा आकडा 9,96,037 वर पोहोचला आहे. तर 13,457 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे.