नैवेद्यं समर्पयामि! बाप्पासाठी यंदा ट्राय करा हटके नैवेद्य, रेसिपी एकदम झटपट...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 04:48 PM2023-09-18T16:48:43+5:302023-09-18T16:57:35+5:30

Ganesh Chaturthi 2023 : यंदा मोदकांबरोबरच अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या फळांपासून आणि डाळींपासून घरच्या घरी गोडधोड असा खास नैवेद्य बनवा.

लाडक्या बाप्पांचे घरात स्वागत होताच, त्यांच्या सरबराईत कोणतीही कसूर राहू नये, हाच प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यामुळेच त्यांच्या सजावटीप्रमाणेच त्यांच्या नैवेद्याची, प्रसादाची गृहिणींकडून खास बडदास्त ठेवली जाते.

बाप्पांना आवडणारे मोदक नैवेद्यात सर्वोच्च स्थानावर असतात. मात्र, यंदा मोदकांबरोबरच अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या फळांपासून आणि डाळींपासून घरच्या घरी गोडधोड असा खास नैवेद्य बनवा.

साहित्य : दोन वाट्या डाळ घोऊन मिक्सरमध्ये पूड करा. अर्धी वाटी डिंकाची पावडर, दीड वाटी पिठीसाखर, एक वाटी साजूक ताप, एक चमचा जायफळ पूड. कृती : तूप गरम करून डिंकावर ओता. हातानी खूप फेसून घ्या. त्यात डाळीची पूड व साखर घाला. लागल्यास दुधाचा हात लावून लाडू वळून घ्या.

साहित्य : एक वाटी मूग, एक वाटी उडीद, एक वाटी सोयाबीन, एक वाटी हरभऱ्याचे रवाळ पीठ. कृती : थोडी कच्ची डिंक पावडर घेऊन त्यावर गरम साजूक तूप ओता. कढईत आणखी तूप घालून पीठ खमंग भाजा. एक वाटीभर खोबरे भाजून, चुरून घाला. चवीनुसार पिठीसाखर किंवा गूळ मऊ करून लाडू वळून घ्या.

साहित्य : एक कपभर पपईच्या फोडी, एक केळ्याचे तुकडे, एका सफरचंदाचे सालीसकट तुकडे (या दोन्ही फळांच्या फोडींना लिंबाचा रस चोळून ठेवा.), तीन संत्र्यांच्या फोडी (बिया व दोरे काढा, पण त्यातला गर काढू नका), एक कप काळी, हिरवी द्राक्षे. कलिंगडाच्या फोडी दोन कप. कृती : सर्व फोडी एकसारख्या आकाराच्या करा. त्यावर मीठ, साखर, ताजा पुदिना आणि एक टोमॅटो चिरून. थोडा चाट मसाला व किसलेलं आलं घालून गार करा.

साहित्य : अर्धा किलो चांगला गूळ, पाव किलो खोबरे किसून, सोनेरी भाजून तळलेले मखाण १०० ग्रॅम, दोन चमचे सुंठ पूड, ४-५ मिरे जाड कुटून, डिंक, चारोळी, खसखस, काजूचे तुकडे. कृती : गूळ व दीड टेबलस्पून पाणी घालून पाक करा. त्यात सुंठ व मिरेपूड घाला. इतर सर्व साहित्य (न कुटता) तसेच घाला व लाडू बनवा. डिंक तळून, चारोळी, खसखस भाजून वापरा.

नेहमीप्रमाणे घरी चक्का बनवून घ्या. त्यात लेमन कलर व पायनापल इसेन्स घालून गाळून घ्या. अगदी बारीक चिरून वाफवलेल्या आणि थोडी साखर घालून शिजवलेल्या अननसाच्या फोडी श्रीखंडात मिसळा किंवा अननसाच्या चकत्या चिरून घाला. अननसाचे यम्मी श्रीखंड तयार.

साहित्य : चार कप रवाळ कणिक, एक कप जाड पोहे, एक कप सुक्या खोबऱ्याचा कीस, ५० ग्रॅम डिंक, अर्धा चमचा जायफळ, जायपत्री पूड, तीन वाट्या पिठीसाखर, काजू तुकडे, साजूक तूप. कृती : थोडं तूप गरम करून पोहे तळून घ्या. डिंकही तळून घ्या. उरलेल्या तुपात कणीक भाजून घ्या. खोबऱ्याचा कीस भाजून घ्या. पोहे, भाजलेले खोबरे, तळलेला डिंक घालून पूड तयार करा. भाजलेली कणीक, पिठीसाखर, पूड, जायफळ पूड घाला. लाडू वळून घ्या.