Hartalika Vrat: हरितालिकेच्या व्रतादिवशी करा या पाच वस्तूंचं दान, लक्ष्मी होईल प्रसन्न, घरी येईल पैशाचा ओघ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 03:09 PM2022-08-28T15:09:58+5:302022-08-28T15:27:18+5:30

Hartalika Vrat: हरितालिकेचं व्रत सुहासिनी स्त्रिया आणि कुमारिका दोन्हीही करतात. जोडीदारासाठीच्या या व्रताचं हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. हे व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं. तसेच कुमारिकांना चांगला वर मिळतो. हरितालिकेच्या दिवशी जर काही खास वस्तूंचं दान केलं तर जीवनामध्ये सुख-समृद्धी येते. माता लक्ष्मी प्रसन्न होते.

हरितालिकेचं व्रत सुहासिनी स्त्रिया आणि कुमारिका दोन्हीही करतात. जोडीदारासाठीच्या या व्रताचं हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. हे व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं. तसेच कुमारिकांना चांगला वर मिळतो. हरितालिकेच्या दिवशी जर काही खास वस्तूंचं दान केलं तर जीवनामध्ये सुख-समृद्धी येते. माता लक्ष्मी प्रसन्न होते.

हरितालिकेच्या दिवशी महिलांनी जर कुठल्याही गरीब ब्राह्मण महिलेला कुवतीप्रमाणे वस्त्रांचं दान केल्यास शुभ फळ मिळते.

हरितालिकेच्या दिवशी तांदुळांचे दान करणे खूप शुभ मानले जाते. तांदळांना हिंदू धर्मात अक्षत म्हटलं जातं. त्यामुळे तांदळांचं दान केल्यास अक्षय फळ मिळतं. तसेभ भगवान शिव पार्वती तुमच्या मनोकामना पूर्ण करतील.

हरितालिकेच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी कुठल्याही ब्राह्मणाला गव्हांचं दान करावं, असे केल्याने घरी धनाची आवक वाढते.

हरितालिकेच्या दिवशी फळांचं दान करणं शुभ मानलं जातं. व्रत करणाऱ्या महिलांनी फळांचं दान करावं. तसेच मंदिरामध्येही फळ अर्पण करावीत.

हरितालिकेच्या दिवशी उडदांची डाळ आणि चण्याच्या डाळीचं दान करणंही खूप शुभ मानलं जातं. या दिवशी वस्तूंचं दान केल्यानंतरच सुहासिनी महिलांनी पाणी प्यावं. असं केल्याने त्यांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी येते.