बिग फाइट: चहामळा कामगारांच्या हाती केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य!

By गजानन चोपडे | Published: April 11, 2024 12:41 PM2024-04-11T12:41:47+5:302024-04-11T12:46:03+5:30

बिग फाइट: विद्यमान खासदाराला भाजपने उमेदवारी नाकारली

The fate of central ministers in the hands of tea workers in assam | बिग फाइट: चहामळा कामगारांच्या हाती केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य!

बिग फाइट: चहामळा कामगारांच्या हाती केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य!

गजानन चोपडे
राज्याच्या दिब्रुगड लोकसभा मतदारसंघात चहामळा कामगारांचे वर्चस्व आहे. त्यांच्याच मतांवर विजयाचे गणित अवलंबून असते. त्यामुळे विद्यमान खासदार रामेश्वर तेली यांचे तिकीट कापून भाजपने यंदा केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यावर डाव लावला आहे.

गेल्या दोन निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. इंडिया आघाडीत हा मतदारसंघ आसाम जातीय परिषदेच्या वाट्याला गेला आणि लुरीनज्योति गोगाई या कामगार नेत्याला भाजपविरुद्ध मैदानात उतरविण्यात आले. लोकसभेच्या एकूण १४ जागांपैकी दिब्रुगडकडे सध्या साऱ्यांचे लक्ष आहे. इंडिया आघाडीनेही तगडा उमेदवार दिल्याने    

सोनोवाल यांचे भवितव्य चहामळा कामगारांच्या हाती आहे. शिवाय उमेदवारी नाकारल्याने रामेश्वत तेली नाराज आहेतच. दिब्रुगडमध्ये झालेल्या विकासकामांचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

चहामाळ्यांसाठी दिब्रुगड प्रसिद्ध आहे. या मतदारसंघावर चहामाळ्यातील कामगारांचे मोठे वर्चस्व असून हीच मते विजयी उमेदवारासाठी निर्णायक ठरतात. या कामगार मतदारांची संख्या ३० टक्के आहे, हे विशेष. 
आम आदमी पार्टीच्या धर्तीवर असम गण परिषदेची स्थापना झाली. २००४ मध्ये असम गण परिषदेचे सर्बानंद सोनोवाल याच मतदारसंघातून विजयी झाले. आता त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे.
स्वातंत्र्यापासून काँग्रेसने वर्चस्व राखलेल्या दिब्रुगडमध्ये यंदा या पक्षाचा उमेदवार नाही. इंडिया आघाडीच्यावतीने लुरीनज्योति गोगोई यांना मैदानात उतरविले आहे. कामगारांसाठी लठणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

 २०१९ मध्ये काय घडले?
रामेश्वर तेली    भाजप (विजयी)    ६,५९,५८३
पबनसिंग घाटोवार    काँग्रेस    २,९५,०१७ 
भाबेन बरुहा    एनपीईपी    ९,७१८
नोटा    -    २१,२८८

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते    टक्के
२०१४    रामेश्वर तेली     भाजप    ४,९४,३६४    ४८%
२००९    पबनसिंग घाटोवार    काँग्रेस    ३,५९,१६३    ३५%
२००४    सर्बानंद सोनोवाल    एजीपी    २,२०,९४४    २१%
१९९९    पबनसिंग घाटोवार    काँग्रेस    २,७०,८६३    २६%
१९९८    पबनसिंग घाटोवार    काँग्रेस    २,३४,१९५    २३%

Web Title: The fate of central ministers in the hands of tea workers in assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.