पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2024 05:39 AM2024-03-10T05:39:01+5:302024-03-10T05:40:25+5:30

सात टप्प्यांत घेतली जाऊ शकते निवडणूक

pm modi to complete state tour on march 13 lok sabha bugle will blow next week | पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल

पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निवडणूक आयोग पुढील आठवड्यात १४ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता असून, ही निवडणूक सात टप्प्यांत घेतली जाऊ शकते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा १० मार्च रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या.

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ मार्चपासून तेलंगणातून सुरू झालेला १२ राज्यांचा १० दिवसांचा झंझावती दौरा संपवत आहेत. गुजरातमध्ये या दौऱ्याचा समारोप होणार आहे. तिथे तीन सेमीकंडक्टर प्रकल्पाचे आणि आसाममधील प्रकल्पाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते भूमिपूजन करतील.

पंतप्रधानांनी तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू आणि काश्मीर, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीचा दौरा केला आहे. पश्चिम कामेंग येथील सेला बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी त्यांनी अरुणाचल प्रदेशला भेट दिली आणि जोरहाटमधील लचित बरफुकन यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी ते आसामला गेले. १० मार्च रोजी पंतप्रधान वाराणसी आणि आझमगढ येथे जातील आणि ११ मार्च रोजी दिल्लीतील ‘नमो ड्रोन दीदी’ आणि ‘लखपती दीदी’ कार्यक्रमांना उपस्थित राहतील. नंतर हरयाणा विभागातील कामाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते गुजरात आणि राजस्थानला जातील.

जम्मू-काश्मीरमध्ये आयाेग घेणार चाचपणी

लोकसभेच्या निवडणुका कधी घेता येतील याचे मूल्यांकन करण्यासाठी दोन सदस्यीय आयोग सोमवार ते बुधवार या कालावधीत जम्मू-काश्मीरला भेट देणार आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकाही घेता येतील का, याची शक्यताही आयोग तपासून पाहणार आहे. मुख्यत्वे याच कारणामुळे केंद्र आणि राज्यातील पक्ष आश्वासने देण्यात आणि प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात व्यस्त आहेत.


 

Web Title: pm modi to complete state tour on march 13 lok sabha bugle will blow next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.