वाराणसीत पंतप्रधान मोदींचं शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज भरण्याआधी करणार रोड शो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 08:35 AM2019-04-25T08:35:36+5:302019-04-25T08:37:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत या घोषणेचा वापर केला होता.

pm modi roadshow varanasi lok sabha election 2019 | वाराणसीत पंतप्रधान मोदींचं शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज भरण्याआधी करणार रोड शो

वाराणसीत पंतप्रधान मोदींचं शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज भरण्याआधी करणार रोड शो

googlenewsNext

नवी दिल्लीः मै यहां आया नही हूं, मुझे मां गंगाने बुलाया है, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत या घोषणेचा वापर केला होता. पंतप्रधान मोदींना माते गंगेनं पुन्हा एकदा बोलावलं आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी मोदी रोड शोदेखील करतील. भाजपानं पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मेगा रोड शोचं आयोजन केलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधकांना मोदी लाट आजही कायम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी औपचारिकरीत्या 26 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीतल्या बाबतपूर विमानतळावर उतरणार आहे. विमानतळावरून मोदी थेट बनारस हिंदू विश्वविद्यालयात जाणार आहेत. तिथे पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर मोदींचा रोड शो सुरू होणार आहे. 

एनडीएतले दिग्गज नेते होणार सहभागी
पीएम मोदींच्या मेगा रोड शोमध्ये भाजपाचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. हा रोड शो बीएचयूपासून दशाश्वमेध घाटापर्यंत होणार आहे. गेल्या निवडणुकीतही मोदींनी याच ठिकाणावरून रोड शो केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी गंगा आरतीमध्ये सहभागी होणार आहेत. मोदींच्या रोड शोमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामण, सुषमा स्वराज, पीयूष गोयल, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.


शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंह बादल, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवानही या रोड शोला उपस्थित राहणार आहेत. या रोड शोसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावण्यात आले असून, रोड शोदरम्यान मोदींवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जाणार आहे. हा रोड शो सात किलोमीटरनंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या द्वाराजवळ संपेल. रोड शोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दशाश्वमेद घाटावर गंगा आरतीत सहभागी होणार आहेत. गंगा आरतीनंतर मोदी काशी विश्वनाथाचे दर्शन करणार आहेत.  

Web Title: pm modi roadshow varanasi lok sabha election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.