कार आणि घरही नाही, राहुल गांधींची संपत्ती ५ काेटींनी वाढली, शपथपत्रातून मिळाली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:04 AM2024-04-04T11:04:40+5:302024-04-04T11:05:05+5:30

Rahul Gandhi's wealth: राहुल गांधी यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे ५ काेटी रुपयांनी वाढली आहे. त्यांच्याकडे २०.५० काेटी रुपयांची संपत्ती आहे. उमेदवारी अर्जासाेबत दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती त्यांनी दिली आहे.

lok sabha election 2024: No car and no house, Rahul Gandhi's wealth increased by 5 crores, the information was obtained from the affidavit | कार आणि घरही नाही, राहुल गांधींची संपत्ती ५ काेटींनी वाढली, शपथपत्रातून मिळाली माहिती

कार आणि घरही नाही, राहुल गांधींची संपत्ती ५ काेटींनी वाढली, शपथपत्रातून मिळाली माहिती

वायनाड - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्या बहीण व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे ५ काेटी रुपयांनी वाढली आहे. त्यांच्याकडे २०.५० काेटी रुपयांची संपत्ती आहे. उमेदवारी अर्जासाेबत दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती त्यांनी दिली आहे. मात्र, गेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न घटले आहे. आयकर विवरणातील ही माहिती त्यांनी दिली आहे. 

राहुल गांधी यांच्यावर १८ गुन्हे दाखल आहेत.  तसेच ‘माेदी’ नावावरुन केलेल्या वक्तव्यप्रकरणी त्यांना दाेन वर्षांची शिक्षा ठाेठाण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी शपथपत्रात केला असून या शिक्षेविराेधात त्यांनी याचिका दाखल केल्याचेही म्हटले राहुल यांनी आहे.

वायनाडच्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमीच त्यांच्या सोबत असेन असे राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजिलेल्या रोड शोप्रसंगी केलेल्या भाषणात म्हटले. वायनाड येथे राहुल गांधी यांचे सकाळी हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर त्यांनी कालपेट्टा ते सिव्हिल स्टेशनपर्यंत रोड शो केला. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले.

गेल्या चार निवडणुकांवेळी एकूण संपत्ती आणि उत्पन्न
२००४        ५५.३८ लाख
२००९        २.३२ काेटी
२०१४        ९.४० काेटी
२०१९        १५.८८ काेटी
    (आकडे रुपयांत) 

यंदा किती संपत्ती?
२०.५० काेटी रुपयांची एकूण संपत्ती सध्याची. 

- उत्पन्न किती? : २०२२-२३ या आर्थिक वर्षात त्यांचे १.०२ काेटी रुपये एकूण उत्पन्न हाेते.
- २०२१-२२ या आर्थिक वर्षात १.३१ काेटी एवढे उत्पन्न हाेते. त्यापुर्वीच वर्षी १.२९ काेटी रुपये उत्पन्न हाेते.

चल संपत्ती
- ५५ हजार राेख रक्कम.
- २६.२५ लाख रुपये बॅंकेच्या बचत खात्यात.
- ४.३३ काेटी रुपयांची शेअर्समध्ये गुंतवणूक.
- ३.८१ काेटी रुपयांची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक.
- ६१.५२ लाख रुपये पाेस्ट व इतर विमा याेजनांमध्ये गुंतवणूक.
- ३३३ ग्रॅम साेने, ४.२० लाख रुपये सध्याचे मुल्य.
- १५.२१ लाख रुपयांचे साॅवरेन गाेल्ड बाॅंड.
- ९.२४ काेटी रुपयांची एकूण गुंतवणूक.

स्थिर संपत्ती किती?
- ११.१५ काेटी रुपयांची एकूण स्थिर मालमत्ता.
- ३.७७ एकर वडिलाेपार्जित शेती. बहिण प्रियंका यांच्यासाेबत अर्धी भागीदारी.
- २.१० लाख रुपये शेतीचे मूल्य राहुल यांच्या वाट्याचे.
- ५,८३८ चाैरस फुटांचे कार्यालय गुरुग्राम येथे.
- ९.०४ काेटी रुपये सध्याचे मूल्य.
-४९.७९ लाख रुपये भाडेकरुंकडून घेतलेले डिपाॅझिट.
 

Web Title: lok sabha election 2024: No car and no house, Rahul Gandhi's wealth increased by 5 crores, the information was obtained from the affidavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.