बडतर्फ जवान तेज बहाद्दूर 'चौकीदारा'विरोधात उभा ठाकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 08:26 PM2019-03-30T20:26:43+5:302019-03-30T20:35:01+5:30

सैन्यदलातील दर्जाहीन जेवणावर आवाज उठवल्याने बडतर्फ केलेले बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात शड्डू ठोकले आहेत.

Baddarf Tarun Bahadur will be standing against 'Chaukidar' | बडतर्फ जवान तेज बहाद्दूर 'चौकीदारा'विरोधात उभा ठाकणार

बडतर्फ जवान तेज बहाद्दूर 'चौकीदारा'विरोधात उभा ठाकणार

Next

रेवाडी : सैन्यदलातील दर्जाहीन जेवणावर आवाज उठवल्याने बडतर्फ केलेले बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात शड्डू ठोकले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींविरोधात वाराणसी मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा तेज बहाद्दूर यांनी केली आहे. 


हरियाणातील रेवारीयेथे शुक्रवारी तेज बहाद्दूर यादव यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. 2017 मध्ये तेज बहाद्दूर यादव यांनी बीएसएफमध्ये दर्जाहीन जेवण देत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर टाकत सैन्य दलातील भ्रष्टाचार उघड केला होता. यावेळी ते भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तैनात होते. मंडी मंदिर मुख्यालयातील 29 व्या बटालियनमध्ये ते कॉन्टेबल या पदावर होते. त्यांची नियुक्ती पूंछ जिल्ह्यातील खेत येथील एलओसीवर झाली होती. 

मी मोदींविरोधात वाराणसीमधून अपक्ष म्हणून उभा राहणार आहे. मी सैन्यातील भ्रष्टाचारावर आवाज उठविला होता. सैन्य दलातील भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार केल्याचे तेज बहाद्दूर यांनी सांगितले. 


हे प्रकरण खूप गाजले होते. गेल्या वर्षी बीएसएफ जवान तेज बहाद्दूर यादव यांच्या व्हिडिओमुळे अधिकारी आणि सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकलं होतं. बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आपला छळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर, तेज बहादूर यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर जवानांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीची आणखीही काही प्रकरणं समोर आली होती.


बहाद्दूर यांच्याकडे दोन मोबाईल बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच सैन्याच्या गणवेशात असताना सोशल मिडियावर फोटो टाकल्याने  सैन्याचे नियम तोडल्याचा आरोप ठेवत त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. 
 

Web Title: Baddarf Tarun Bahadur will be standing against 'Chaukidar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.