"मोदींना माहीत आहे की फक्त अरविंद केजरीवाल हेच त्यांना...": आतिशी यांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 05:09 PM2024-03-25T17:09:33+5:302024-03-25T17:11:02+5:30

अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवरून आम आदमी पक्ष भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. आज पुन्हा एकदा दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी सिंह यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

Arvind Kejriwal arrest aap atishi singh said bjp arrested due to fear of defeat in lok sabha election | "मोदींना माहीत आहे की फक्त अरविंद केजरीवाल हेच त्यांना...": आतिशी यांचं टीकास्त्र

"मोदींना माहीत आहे की फक्त अरविंद केजरीवाल हेच त्यांना...": आतिशी यांचं टीकास्त्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवरून आम आदमी पक्ष भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. आज पुन्हा एकदा दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी सिंह यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. त्य़ा म्हणाल्या की, भाजपाला फक्त अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच आव्हान देऊ शकते, त्यामुळेच केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

आतिशी सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, "लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक का करण्यात आली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहित आहे की, त्यांना फक्त अरविंद केजरीवालच आव्हान देऊ शकतात."

आम आदमी पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडे पैसे मिळाले नसल्याचा दावाही आतिशी सिंह यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच केजरीवाल यांना का अटक करण्यात आली, असा सवाल विचारला. पंतप्रधान मोदींना माहित आहे की, उद्या जर कोणी नेता आपला पराभव करणार असेल तर ते अरविंद केजरीवाल आहेत आणि याच भीतीमुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

आतिशी सिंह पुढे म्हणाल्या की, " अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही पुराव्याशिवाय ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीच्या मागे लपून भाजपा आपली राजकीय लढाई लढत आहे. ईडी हा राजकीय पक्ष आहे का?" अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकारण तापलं आहे. 
 

Web Title: Arvind Kejriwal arrest aap atishi singh said bjp arrested due to fear of defeat in lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.