सिडको विभागीय कार्यालयात मतदान शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:01 AM2019-04-27T01:01:58+5:302019-04-27T01:03:38+5:30

मी मतदान करणारच अशा आशयाची शपथ शुक्रवारी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. स्विपचे नोडल अधिकारी योगेश सूर्यवंशी यांनी मनपा विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत उपस्थित होत्या.

Voting sworn in CIDCO departmental office | सिडको विभागीय कार्यालयात मतदान शपथ

सिडको विभागीय कार्यालयात मतदान शपथ

Next

सिडको : मी मतदान करणारच अशा आशयाची शपथ शुक्रवारी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. स्विपचे नोडल अधिकारी योगेश सूर्यवंशी यांनी मनपा विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत उपस्थित होत्या.
आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करून निवडणुकांमध्ये सहभागी होत निर्भयपणे मतदान करण्यासाठी नाशिक शहरातील विविध कार्यालयांमध्ये कर्मचाºयांना मतदान करण्याची शपथ दिली जात आहे. शुक्रवारी मनपा विभागीय कार्यालयात सर्व कर्मचाºयांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.
यावेळी कर्मचाºयांनी धर्म, वंश, जात, भाषा, समाज यांच्या दबावाखाली न येता व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी प्रकाश शेवाळे, पंकज गांगुर्डे, विजय कवर, अनिल सूळ व सर्व मनपा कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Voting sworn in CIDCO departmental office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.