शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचा विजय ;  युतीची बाजी, आघाडीला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 02:10 AM2019-05-24T02:10:43+5:302019-05-24T02:25:22+5:30

लोकसभा निवडणुकीत शहरासह ग्रामीण भागावर वचर्स्व निर्माण करणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीचा वरचष्मा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाला तर दुसरीकडे राष्टवादीचे हेविवेट नेता छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची वाटचाल अडखळली नव्हे महाआघाडीला मोठा धक्का बसला.

Shiv Sena's Hemant Godse wins; Alliance, push forward | शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचा विजय ;  युतीची बाजी, आघाडीला धक्का

शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचा विजय ;  युतीची बाजी, आघाडीला धक्का

googlenewsNext

नाशिक : लोकसभा निवडणुकीत शहरासह ग्रामीण भागावर वचर्स्व निर्माण करणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीचा वरचष्मा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाला तर दुसरीकडे राष्टवादीचे हेविवेट नेता छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची वाटचाल अडखळली नव्हे महाआघाडीला मोठा धक्का बसला. युतीचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांनी अंतिम निकालाअंती २,९२,२०४ मताधिक्क्याने विजयी आघाडी घेत समीर भुजबळ यांचा दारूण पराभव केला. भाजपाचे बंडखोर उमेदवार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे हे तिसºया तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन चंद्रकांत पवार हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.
विधानसभा निवडणुकीची नांदी ठरणाºया लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि.२३) निकाल लागला असून, यात युतीने पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यात सत्ता असतानही सेना-भाजपा धुसफूस सुरू होती. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना-भाजपा आणि शिवसेनेची युती झाली, त्याचा फायदा भाजपा-सेनेला झाला. मात्र महाआघाडीला धक्का सहन करावा लागला.
या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ५,६३,५९९ मते मिळाली, तर राष्टÑवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना २,७१,३९५ मते मिळाली. म्हणजेच गोडसे यांना २,९२,२०४ एवढे मताधिक्य मिळाले. भाजपाचे बंडखोर माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांना १,३४,५२७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना १,०९,९८१ मते मिळाली.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता अंबडच्या सेंट्रल वेअर हाउस येथे निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय १४ अशा प्रकारे नाशिक मतदारसंघासाठी ८४ टेबल लावण्यात आले होते. तत्पूर्वी सकाळी ६ वाजेपासूनच मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मतमोजणी केंद्रात आगमन झाल्याने कोणत्या टेबलावर कोण अधिकारी, कर्मचारी असेल ते संगणकीयप्रणालीने जाहीर करण्यात आले व प्रत्येकाला आपल्या टेबलावर आसनस्थ करण्यात आले. ८ वाजेच्या ठोक्याला उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमक्ष निवडणूक निर्णय अधिकाºयांनी मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉँग रूमचे सील काढण्यात आले. त्यानंतर पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात आली. यंदा पोस्टल मतपत्रिकांना बारकोड असल्यामुळे व प्रत्येक मतपत्रिकेचे स्कॅनिंग करण्याचे आयोगाचे आदेश असल्याने अत्यंत काळजीपूर्वक या मतिपत्रका मोजण्यास सुरु वात करण्यात आली. परंतु निवडणूक आयोगाच्या सर्व्हरमध्ये बिघाड झल्यामुळे मोजणी होऊ शकली नाही. बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर त्यामुळे आयोगाच्या आदेशाने ईव्हीमची मतमोजणी सुरू करण्यात आली.
या निकालाचा ऐतिहासिक संदर्भ
नाशिकमध्ये एकदा निवडून गेलेला खासदार पुन्हा निवडून येत नाहीत असा १९७१ सालापासूनचा इतिहास आहे. त्यामुळे नाशिकचा खासदार नो रिपीट असा प्रचाराचा मुद्दा देखील असतो. परंतु यंदा मात्र हेमंत गोडसे यांनी ही परंपरा खंडित केली आणि तब्बल ४८ वर्षांनी खासदार पुन्हा निवडून येण्याचा अनोखा विक्रम नोंदविला. यापूर्वी १९६७ साली भारतीय राष्टÑीय काँग्रेसचे भानुदास कवडे हे विजयी झाल्यानंतर पुन्हा
यापूर्वी १९७१ मध्ये ते सलग निवडून आले होते. त्यांच्या पूर्वी १९५१ मध्ये कॉँग्रेस पक्षाचेच गो. ह. देशपांडे हे निवडून आल्यानंतर पुढील म्हणजेच १९५७ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. परंतु सलग निवडून येणारे खासदार म्हणून कवडे एकमेव होते. त्यानंतर हा विक्रम कोणी मोडला नव्हता. परंतु नाशिकचा खासदार नो रिपीट हा सातत्याने चालणारा प्रचार मोडीत काढून हेमंत गोडसे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
समीर भुजबळ यांच्या पराभवाची पाच कारणे
केंद्रातील मोदी लाट पुन्हा एकदा दिसून आल्याने त्यासमोर टिकाव लागला नाही.
छगन भुजबळ यांच्याऐवजी उमेदवारी दिल्याने असलेली पक्षांतर्गत नाराजी.
केवळ राष्टवादीवरच मदार, मित्र कॉँग्रेस पक्षाकडून अपेक्षित भरीव साथ नाही.
वंचित आघाडीने उमेदवार उभे केल्याने मतांचे झालेले विभाजन.
पूर्वाश्रमीचे कॉँग्रेस पण आता भाजपा बंडखोर असलेल्या कोकाटे यांच्या उमेदवारीचा फटका.
जनसेवेचा वसा पुढे सुरूच ठेवणार
नाशिककरांनी दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारतो. या निकालामुळे जनसेवेच्या कामावर कुठलाही परिणाम होणार नाही. हा जनसेवेचा वसा यापुढेही अविरत सुरूच राहील. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर आम्ही नेहमीच लढा दिला आहे. यापुढेही तो अविरतपणे सुरू राहील. गेली पाच वर्षे विकासाची घोडदौड पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे नाशिकला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी निवडणुकीला सामोरे गेलो होतो. आता पराभवाने खचून न जाता विधानसभेसाठी सज्ज होणार आहे.
- समीर भुजबळ, पराभूत उमेदवार, राष्टवादी कॉँग्रेस
नाव               पक्ष                 मते
हेमंत गोडसे शिवसेना ५,६३,५९९
समीर भुजबळ राष्टवादी २,७१,३९५
माणिकराव कोकाटे अपक्ष १,३४,५२७
पवन पवार वंचित आघाडी १,०९,९८१
वैभव आहिरे बसपा ५,७१९
सोनिया जावळे आयटीपी ६,९५२
विनोद शिरसाठ हिजपा १,३६२
ंशिवनाथ कासार बमुपा ८६६
संजय घोडके बीआरसी ८९९
शरद आहेर अपक्ष १,३८७
प्रकाश कनोजे अपक्ष ९२२
सिंंधूबाई केदार अपक्ष १,३३६
देविदास सरकटे अपक्ष ४,२७४
धनंजय भावसार अपक्ष १,८८५
प्रियंका शिरोळे अपक्ष २,२०६
विलास देसले अपक्ष ३,८२६
शरद धनराव अपक्ष ८३५
सुधीर देशमुख अपक्ष १,८८१
नोटा ६,९८०

Web Title: Shiv Sena's Hemant Godse wins; Alliance, push forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.