वाढत गेला उत्साह आणि जल्लोष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 02:03 AM2019-05-24T02:03:49+5:302019-05-24T02:04:14+5:30

चुरशीची आणि अश्चित निकाल म्हणून चर्चेत असलेली निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झालेच, परंतु प्रत्येक फेरीनंतर वाढत गेलेल्या मताधिक्याने गोडसे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत गेला.

 Increasing enthusiasm and dolor! | वाढत गेला उत्साह आणि जल्लोष !

वाढत गेला उत्साह आणि जल्लोष !

Next

नाशिक : चुरशीची आणि अश्चित निकाल म्हणून चर्चेत असलेली निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झालेच, परंतु प्रत्येक फेरीनंतर वाढत गेलेल्या मताधिक्याने गोडसे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत गेला. सुरूवातीला मतमोजणी सुरू झाल्यानंतर काहीकाळ गोडसे मागे पडले होते. मात्र नंतर जी आघाडी त्यांनी मिळवली त्यात त्यांनी पुन्हा मागे बघितले नाही.
पहिल्या फेरीनंतर...
या निवडणुकीत नाशिक मतदार संघात १८ लाख ८२ हजार १११ मतदारांपैकी ५९ टक्के म्हणजे ११ लाख, १८ हजार ५२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने विजयाचा दावा केला असला तरी, खरी लढत सेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच झाली. अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे व बहुजन वंचित आघाडीचे पवन पवार यांनी अनुक्र मे तिसऱ्या व चौथ्या क्र मांकावर राहिले. सेनेचे गोडसे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली त्यांना पहिल्या फेरीत २५००२५ मते मिळाली, तर भुजबळ  यांना १६ हजार ४२० मते मिळाली. पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी गोडसेंनी कायम ठेवली. त्या मानाने अपक्ष माणिकराव कोकाटे हे तिसऱ्या क्र मांकावर कायम राहिले. पहिल्या फेरीत कोकाटे यांना ७२१८, तर पवार यांना २८६८ मते मिळाली.
पवारांचा काढता पाय
दुसºया फेरीत गोडसेंनी आघाडी कायम ठेवत भुजबळ यांच्यापेक्षा २२७०७ मतांनी आघाडी घेतली. गोडसे यांना ४७, ७१२, तर भुजबळ यांना ३३१९४ मते मिळाली. कोकाटे याना १३,२७८, तर पवार यांना ६२१९ मते मिळाली. दुसºया फेरीनंतर बहुजन वंचित आघाडीचे पवन पवार यांनी मतदान केंद्रातून काढता पाय घेतला. त्यानंतर पक्षाचे मोजकेच अन्य कार्यकर्ते हजर होते.
तिस-या फेरीनंतर..
दुपारी साडेबारा वाजता तिसरी फेरी जाहीर करण्यात आली. त्यात ही गोडसेंनी मतांची आघाडी कायम ठेवली. गोडसे यांना ७१,०४८, तर भुजबळ यांना ४८६०० मते मिळाली. कोकाटे यांना २१३९४ व पवार यांना ८७०९ मते मिळाली.
नाशिक मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतमोजणी धिम्यागतीने सुरू होती. दुपारी दीड वाजता चौथी फेरी जाहीर करून मतमोजणी कर्मचाऱ्यांना जेवणाची सुट्टी देण्यात आली. या फेरीत गोडसे हे ३५३०२ मतांनी आघाडीवर  राहिले.  गोडसे यांना ९७३१५, तर भुजबळ यांना ६२०१३ मते मिळाली कोकाटे यांना २५७१८ व पवार यांना ११८७२ मते मिळाली.
फेरीगणिक वाढले मताधिक्य...
नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रत्येक फेरीनंतर मताधिक्क्य वाढतच गेले त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. मात्र एक लाखाचा फरक दिसू लागल्यानंतर राष्टÑवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना सात-आठ फेरीत काय होते नंतर चित्र बदलेल, असा विश्वास होता. त्यामुळे चित्र पालटेल असे ते सातत्याने सांगत होते. परंतु नंतर मात्र असे घडले नाही. फरक वाढतच गेला.
लाखाचा फरक...
साधारणत: बाराव्या फेरीला मतदानात गोडसे यांना आणखी अनुकूलता दिसू लागली आणि सव्वा लाखाचा फरक गोडसे आणि भुजबळ यांच्यात दिसू लागला. जिवा पांडू गावित वगळता समीर भुजबळ किंवा अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी मात्र याठिकाणी भेट दिली नाही.

 

 

Web Title:  Increasing enthusiasm and dolor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.