मोदींना थेट ऐकले अन् ‘चौकीदारा’ची भावनाही आवडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:54 AM2019-04-23T00:54:38+5:302019-04-23T00:56:29+5:30

पिंपळगाव बसवंत येथील मैदानावर ११ वाजता नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार असल्याने सभास्थळी सकाळी ९ वाजेपासूनच नागरिकांची गर्दी होऊ लागली होती.

 He listened directly to Modi and liked the feeling of 'chowkidar' | मोदींना थेट ऐकले अन् ‘चौकीदारा’ची भावनाही आवडली

मोदींना थेट ऐकले अन् ‘चौकीदारा’ची भावनाही आवडली

Next

नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील मैदानावर ११ वाजता नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार असल्याने सभास्थळी सकाळी ९ वाजेपासूनच नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. १०.३० वाजेच्या सुमारास सर्व प्रकारच्या वाहनांना व्हीआयपी पार्किंगपासून पुढे मज्जाव करण्यात आला होता. जे लोक लवकर आले त्यांनी आपली ‘खुर्ची’ सांभाळून घेत जागा राखल्याचे दिसून आले. जागेसाठी दोन ते अडीच तास अगोदर येऊन नागरिकांनी मोदींची प्रतीक्षा केली. यावेळी भाजपा-शिवसेना पक्षांकडून नागरिकांना सभास्थळी आणण्यासाठी विविध आमदारांनीही ‘जोर’ लावला होता. त्यांना वाहनांची व्यवस्था करून देत सभास्थळी आणण्यात आले. मालवाहू ट्रक, जीप, बस, कार यांसारख्या वाहनांमधून नागरिक सभास्थळी पोहचले होते. नाशिक-दिंडोरी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृद्धांना मोदी यांच्या सभेसाठी आणण्यात आल्याने गर्दी झाली होती. सभेसाठी आलेल्यांना पिण्याचे थंड पाणी, अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सभामंडपात पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध होते. नागरिकांना उन्हामुळे होणाºया काहिलीपासून दिलासा मिळाला. सकाळी १० वाजेपासून आल्याचे सार्थक झाले, मोदींना प्रत्यक्षपणे बघता आले व त्यांचे भाषणही ऐकता आले, याचे समाधान वाटल्याचे तरूण सचिन भोईटे याने सांगितले.

...पण मोदींचे भाषण ऐकू आले नाही
मोदींचे भाषण ऐकण्यासाठी कळवणवरून आलेले शेतकरी विश्वास पालवे, मुरलीधर बहिरम यांना विलंब झाला. सभास्थळी गर्दीही खूप असल्याने त्यांना जागा खूप मागे मिळाली. त्यामुळे भाषण व्यवस्थित ऐकू आले नाही; मात्र समारोपाप्रसंगी मोदींनी दिलेल्या ‘चौकीदार’च्या घोषणा कानी पडल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाचा हक्क आवर्जून बजावणार असल्याचे पालवे व बहिरम म्हणाले.
सभेसाठी आलेल्या महिला म्हणतात... सकाळी ८.३० वाजताच घर सोडले
‘नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष बघायची इच्छा पूर्ण झाली. मोदींच्या सभेला उपस्थित राहणार, असा निर्धार करून ठेवला होता. त्यामुळे सकाळी ८.३० वाजताच घरातून निघालो. त्यांचे ‘चौकीदार’ होणे आवडले, भाषण ऐकून समाधान वाटले’, अशा भावना पिंपळगावच्या स्थानिक ज्येष्ठ महिला नमाबाई जाधव यांनी बोलून दाखविल्या. पुष्पा आहेर यांनीही मोदी यांचे भाषण छान होते असे सांगत त्यांनी सरकारमध्ये असताना देशाच्या जवानांचा वाढविलेला आत्मविश्वास चांगला वाटल्याचे सांगितले. पुढील पाच वर्षे त्यांना सत्ता मिळाल्यास देशाचा मोठा विकास घडून येईल, असा आशावादही त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
असे होते सभेचे नियोजन
ंमैदानाभोवती पोलिसांचा फौजफाटा...
पिंपळगाव बसवंत येथील मुख्य मैदानापासून अडीच किलोमीटर अंतरावर सभेसाठी येणाºया नागरिकांच्या वाहनांसाठी वाहनतळ उभाण्यात आले होते. तेथून सभास्थळी जाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. नागरिकांना पिण्याचे पाणी, अल्पोहार पुरविण्यात आल्याने अल्पोहाराचा लाभ घेण्यासाठी झुंबड उडाल्याचे दिसले.

Web Title:  He listened directly to Modi and liked the feeling of 'chowkidar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.