सटाण्याची पाणी योजना सहा महिन्यात पूर्ण करू :  देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:23 AM2019-04-25T01:23:24+5:302019-04-25T01:24:43+5:30

येत्या सहा महिन्याच्या आत सटाणा शहराची पाणी योजना असो अथवा सिंचन योजना पूर्ण करण्याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना दिली.

Complete plan of meeting for six months: Devendra Fadnavis | सटाण्याची पाणी योजना सहा महिन्यात पूर्ण करू :  देवेंद्र फडणवीस

सटाण्याची पाणी योजना सहा महिन्यात पूर्ण करू :  देवेंद्र फडणवीस

Next

सटाणा : येत्या सहा महिन्याच्या आत सटाणा शहराची पाणी योजना असो अथवा सिंचन योजना पूर्ण करण्याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना दिली.
धुळे लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ येथील पाठक मैदानावर बुधवारी (दि.२४)जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, महाआघाडीचे नेते राहुल गांधी दूरचित्रवाहीनीवरील मालिकेतील काल्पनिक पात्राप्रमाणे केवळ मनोरंजन करत आहेत, त्यांचे कोणी मनावर घेऊ नये अशी खिल्ली उडवत त्यांनी कॉँग्रेसवर जोरदार टीका केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांचीही यावेळी भाषणे झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, माजी आमदार दिलीप बोरसे, भाजप तालुकाध्यक्ष संजय भामरे, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, नगराध्यक्ष सुनील मोरे, अण्णा सावंत, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते.
सर्वमान्य तोडगा काढू
सटाणा शहरासाठी संजीवनी ठरणारी पुनंद पाणीपुरवठा योजना पूर्ण करताना शेतकऱ्यांशी चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढण्यात येईल. येत्या सहा महिन्यात  या भागातील सर्वच सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही,
असे आश्वासनही त्यांनी  यावेळी दिले.

Web Title: Complete plan of meeting for six months: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.