नांदेडच्या राज्य नेतृत्वाला रोखण्याचा डाव उधळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:55 AM2019-04-17T00:55:10+5:302019-04-17T00:57:05+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण रिंगणात उतरल्यानंतर काँग्रेसच्या या बालेकिल्यात भाजपने आज प्रचंड ताकद लावली

trying to stop Nanded's State Leadership | नांदेडच्या राज्य नेतृत्वाला रोखण्याचा डाव उधळा

नांदेडच्या राज्य नेतृत्वाला रोखण्याचा डाव उधळा

Next
ठळक मुद्देवसंतराव चव्हाण भाजपाचे चक्रव्यूह नांदेडकर भेदणार

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण रिंगणात उतरल्यानंतर काँग्रेसच्या या बालेकिल्यात भाजपने आज प्रचंड ताकद लावली असून, संपूर्ण पक्षाने एकट्या नांदेड मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. हा प्रकार नांदेडचे राज्य नेतृत्व रोखण्याचा डाव असून तो नांदेडकर जनताच उधळून लावेल असा विश्वास आमदार वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केला.
मंगळवारी नायगाव तालुक्यातील मांजरम येथे आयोजित कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होती. यावेळी आ. वसंतराव चव्हाण म्हणाले, अशोकराव चव्हाण यांच्याकडे काँग्रेसची राज्यातील प्रचाराची धुरा असून, काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. चव्हाण यांनी दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्रीपदही भूषविले असून त्यांच्याच पुढाकारामुळे नांदेडचा कायापालट झाला आहे.
चव्हाण यांच्यातच विकासाची धमक आणि दृष्टी असल्याने विविध योजनांसाठी कोट्यवधींचा निधी त्यांनी नांदेडसाठी खेचून आणला. नांदेडचे हे राज्यस्तरीय नेतृत्व जपण्याची भावना आज विविध क्षेत्रांतून उमटत आहे. त्याविरुद्ध अख्खी भाजप मैदानात उतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा झाली. तर आश्चर्य म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी एकाच मतदारसंघात तळ ठोकून तीन सभा घेतल्या. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही सभा घेतली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बैठक घेत आहेत. एकंदर एका नेत्याविरुद्ध मोठी फलटण उभी करण्याचे टोकाचे प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप करीत वसंतराव चव्हाण म्हणाले की, चक्रव्युह करून नांदेडच्या नेतृत्वाला अडचणीत आणण्याची यामागे विरोधकांची खेळी आहे. हा डाव यापूर्वीही खेळला गेला, परंतु महापालिका निवडणुकीत एकजूट दाखवित नांदेडकरांनी भाजपला रिंगणाबाहेर फेकले.
देशात, राज्यात सत्ता नसताना महापालिकेची एकहाती सत्ता नांदेडकरांनी अशोकराव चव्हाण यांच्या पारड्यात टाकली. आता पुन्हा लोकसभेच्या रिंगणातही एकट्याला गाठण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मात्र नांदेडची जनता हा प्रकार सहन करणार नसल्याचे सांगत, जिल्हावासिय ताकदीने काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले असून, मतदारसंघातील सर्व समाजघटकांबरोबर साहित्यिकांनीही जाहीरपणे अशोकरावांनाच साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच गावातील व्यापारी, सर्व स्तरातील नागरिकांनी 'नेतृत्व जपूया' ही भूमिका घेतली असून, याच नांदेडकरांच्या बळावर अशोकराव चव्हाण मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केला.
बैठकीला बालाजी मद्देवाड, प्रा. मनोहर पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. चव्हाण यांनी गटनिहाय आढावा घेतला. काँग्रेस-राष्टÑवादी पदाधिकारी एकजुटीने अशोकराव चव्हाण यांना निवडून आणतील, असा विश्वासही व्यक्त केला.

Web Title: trying to stop Nanded's State Leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.