२५ लाखांची दारु, वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:12 AM2019-04-12T00:12:27+5:302019-04-12T00:13:11+5:30

लोकसभा निवडणुकीत मतदारांना आमिष दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो़ त्यासाठी दररोज पार्ट्यांचा बेत ठरविण्यात येतो़ यावर आवर घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस दलाचे अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत़ आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ लाख ५६ हजार रुपये तर पोलिसांनी १२ लाख ३५ हजार रुपयांची दारु आणि वाहने जप्त केली

25 lakhs liquor and vehicles were seized | २५ लाखांची दारु, वाहने जप्त

२५ लाखांची दारु, वाहने जप्त

Next

शिवराज बिचेवार।
नांदेड : लोकसभा निवडणुकीत मतदारांना आमिष दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो़ त्यासाठी दररोज पार्ट्यांचा बेत ठरविण्यात येतो़ यावर आवर घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस दलाचे अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत़ आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ लाख ५६ हजार रुपये तर पोलिसांनी १२ लाख ३५ हजार रुपयांची दारु आणि वाहने जप्त केली आहेत़
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात ११२ गुन्हे हे वारस गुन्हे असून बेवारस गुन्ह्यांची संख्या ६८ आहे़ तर पोलिसांनी ५ हजार ३११ लिटर दारु, ५०५५ किलो मोहफुल असा एकूण १२ लाख ३५ हजार ५४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
चार भरारी पथके
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार भरारी पथकांची नियुक्ती केली आहे़ त्याचबरोबर सीमाभागात असलेल्या देगलूर आणि कारला या ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले आहेत़ तेलंगणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे यांनी या रस्त्यावरील तपासणी नाक्यांना भेटी दिल्या़ या पथकाच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळात होणाऱ्या अवैध दारुविक्री, वाहतूक आणि निर्मितीवर प्रतिबंध घालण्यात येत असल्याची माहिती सांगडे यांनी दिली़

Web Title: 25 lakhs liquor and vehicles were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.