नागपुरात पुरुषाला दाखवले महिला, महिलेचे बदलले नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:22 PM2019-04-10T22:22:31+5:302019-04-10T22:24:16+5:30

गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. एकेक मताची किंमत सांगून जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी लोकांना आवाहन सुद्धा केले जात आहे. यासाठी जनजागृती सुद्धा केली जात आहे. परंतु दुसरीकडे मतदार सेवा पोर्टल मात्र मतदारांसाठी त्रासदायक ठरले आहे. बुधवारी एका मागोमाग अनेक असे प्रकरण उघडकीस आले की ज्यामुळे मतदार निराश झालेत.

Women shown to man in Nagpur, name of woman changed | नागपुरात पुरुषाला दाखवले महिला, महिलेचे बदलले नाव

नागपुरात पुरुषाला दाखवले महिला, महिलेचे बदलले नाव

Next
ठळक मुद्देमतदार सेवा पोर्टल बनले त्रासाचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. एकेक मताची किंमत सांगून जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी लोकांना आवाहन सुद्धा केले जात आहे. यासाठी जनजागृती सुद्धा केली जात आहे. परंतु दुसरीकडे मतदार सेवा पोर्टल मात्र मतदारांसाठी त्रासदायक ठरले आहे. बुधवारी एका मागोमाग अनेक असे प्रकरण उघडकीस आले की ज्यामुळे मतदार निराश झालेत.
मतदार वेगवेगळे, इपिक सारखे कसे
शहरातील रुपेश आणि अर्चना नावाच्या दाम्पत्याने मतदार सेवा पोर्टलवर इपिकच्या माध्यमातून आपले मतदान केंद्र शोधण्याचा प्रयत्न केला तर ते आश्चर्यचकित झाले. कारण पुरुषाच्या इपिक नंबरवर दुसऱ्याच महिला मतदाराची माहिती दिसून आली. तसेच महिलेच्या इपिक नंबरवर दुसऱ्या महिलेची माहिती होती.
अगोदर सांगितले नाही, नंतर मिळाली माहिती
मतदार सेवा पोर्टलबाबत अशाच प्रकारच्या तक्रारी दिवसभर मिळत होत्या. एका मतदाराने सांगितले की, त्यांनी जेव्हा वेबसाईट उघडली आणि आपले नाव मतदार यादीत शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्व्हरच्या समस्येमुळे त्यांना यश आले नाही. मग त्यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला, आणि त्यांना आपली समस्या सांगितली. हेल्पलाईनकडून त्यांना हे सांगण्यात आले की, व्होटर लिस्टमध्ये त्यांच्या नावाचा कुठलाही डाटा उपलब्ध नाही. नंतर त्यांनी पुन्हा मतदार सेवा पोर्टलवर इपिक नंबरच्या मदतीने आपले नाव शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा थोड्या अडचणीनंतर त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांची नावे त्यात सापडली.
‘सर्व्हर स्लो’ असल्याने त्रास
बुधवारी ज्या मतदारांनी आपल्या मतदान केंद्रांबाबत माहिती घेण्यासाठी मतदार सेवा पोर्टलला भेट दिली, त्यापैकी बहुतांश मतदारांना सर्व्हर स्लो असल्याने त्रास सहन करावा लागला. बहुतांश मतदारांना या पोर्टलवर ‘समथिंग वेंट राँग’ असा मॅसेज दिसून येत होता. काही मतदारांनी तर अनेकदा प्रयत्न केल्यावर जेव्हा पोर्टल काम करीत नसल्याचे दिसून आले तेव्हा त्यांनी नाव शोधणेच बंद केले.

 

Web Title: Women shown to man in Nagpur, name of woman changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.