धक्कादायक : नागपुरातील ४५० कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:34 AM2019-04-16T00:34:22+5:302019-04-16T00:36:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील निवडणूक कामासाठी तैनात असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसंदर्भात ...

Shocking : 450 employees postal ballot cancelled in Nagpur | धक्कादायक : नागपुरातील ४५० कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट रद्द

धक्कादायक : नागपुरातील ४५० कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक निवडणूक कर्मचाऱ्यांनी भरले चुकीचे अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील निवडणूक कामासाठी तैनात असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसंदर्भात भरलेल्या अर्जात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. चुकीचे अर्ज भरणाऱ्या ४५० कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट पेपर रद्द झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.
निवडणूक कामासाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटद्वारा मतदानाचा हक्क बजावता येतो. त्यासाठी त्यांना निवडणूक कामाच्या प्रशिक्षणादरम्यान एक फॉर्म भरून द्यावा लागतो. यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यास त्याची संपूर्ण माहिती भरावी लागते. या माहितीच्या आधारावर निवडणूक विभागातील कर्मचारी त्या कर्मचाऱ्याचे नाव मतदार यादीत शोधतात. ते बरोबर सापडले तर त्याला पोस्टल बॅलेट पेपर पाठविले जातात. हे पोस्टल बॅलेट संबंधित निवडणूक कर्मचाऱ्याच्या घरी पाठविले जाते. नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात जवळपास
साडेएकोणवीस हजारावर पोस्टल बॅलेटसाठी कर्मचाऱ्यांनी अर्ज भरला. परंतु ४५० कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली माहिती प्रचंड त्रुटीपूर्ण आणि चुकीची होती. बहुतांश लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर मतदार यादीत त्यांचे नाव शोधले असता, ते सापडले नाही. अशा एकूण ४५० लोकांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे, याची माहिती त्यांना रीतसर देण्यात येणार आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करता येणार
निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक विभागाने मतदानापूर्वी दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयातच मतदानाची विशेष व्यवस्था केली होती. त्याचा काही जणांनी लाभ घेतला. ज्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहेत ते जमा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. रामटेकसाठी एसडीओ ग्रामीण तर नागपूरसाठी एसडीओ शहर कार्यालयात एक बॉक्स ठेवण्यात आला आहे. त्यात पोस्टल बॅलेट प्रत्यक्ष जमा करता येऊ शकते. पोस्टानेसुद्धा विभागात बॅलेट येत आहेत. २३ मेपर्यंत पोस्टल बॅलेट जमा करता येणार असले तरी कर्मचाऱ्यांनी एक दिवसापूर्वीच ते जमा केल्यास चांगले होईल, अन्यथा वेळेवर धावपळ होण्याची शक्यता आहे.

 

 

 

Web Title: Shocking : 450 employees postal ballot cancelled in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.