नागपूर-रामटेकमध्ये हत्तीची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 08:47 PM2019-05-24T20:47:21+5:302019-05-24T20:49:38+5:30

हत्तीच्या चालीवर भाजप-काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची गणिते ठरत होती. बसपाचा हत्ती हळूवारपणे का होईना प्रत्येक निवडणुकीत गतिशील राहिला आहे. त्याची मतांची संख्या ही वाढत गेली आहे. परंतु यावेळी बसपाचे सारेच गणित फेल ठरले. अनेक वर्षांनंतर बसपाने बाहेरचा उमेदवार न देता पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. परंतु मतदारांनी मात्र पाठ दाखविल्याने हत्तीची गती मंदावली.

The movement of elephants in Nagpur-Ramtek slowed | नागपूर-रामटेकमध्ये हत्तीची गती मंदावली

नागपूर-रामटेकमध्ये हत्तीची गती मंदावली

Next
ठळक मुद्दे५० हजाराचा टप्पाही ओलांडला नाही : तिसरा क्रमांक मात्र कायम

आनंद डेकाटे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हत्तीच्या चालीवर भाजप-काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची गणिते ठरत होती. बसपाचा हत्ती हळूवारपणे का होईना प्रत्येक निवडणुकीत गतिशील राहिला आहे. त्याची मतांची संख्या ही वाढत गेली आहे. परंतु यावेळी बसपाचे सारेच गणित फेल ठरले. अनेक वर्षांनंतर बसपाने बाहेरचा उमेदवार न देता पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. परंतु मतदारांनी मात्र पाठ दाखविल्याने हत्तीची गती मंदावली. गेल्या निवडणुकीत बसपाने तब्बल ९६ हजारावर मते घेतली होती. या निवडणुकीत बसपाच्या जमाल सिद्दीकी यांना केवळ ३२ हजार मतांपर्यंतच मजला मारता आली. बसपाच्या दृष्टीने एकमेव जमेची बाजू राहिली ती म्हणजे बसपाचा उमेदवार हा यंदाही तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
गेल्या काही निवडणुकांचा आढावा घेता, नागपूररामटेक या दोन्ही लोक सभा मतदारसंघात बसपाच्या हत्तीने गती धरल्याचे दिसते. १९९८ चा अपवाद वगळता १९९१ ते २००९ च्या निवडणुकांमध्ये बसपाच्या मतांचा आलेख चढतच गेलेला आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये बसपाचा हत्ती हा नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात जोरात धावला होता. रामटेकमधील बसपाच्या उमेदवार किरण पाटणकर यांनी ९५,०५१ मते घेतली होती, तर नागपुरातून डॉ. मोहन गायकवाड यांनी ९६,४३३ मते घेतली होती. अशाप्रकारे बसपाने नागपुरात दोन लाखाची व्होट बँक तयार केली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बसपाकडे विशेष लक्ष होते. बसपानेही यावेळी आपली रणनीती बदलली. ऐनवेळी बाहेरचा उमेदवार आयात केला जातो असा बसपावर आरोप व्हायचा. तो आरोप खोडून काढण्यासाठी बसपाने यंदा पक्षाच्याच कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. नागपुरातून बसपाचे नगरसेवक मोहम्मद जमाल तर रामटेकमधून सुभाष गजभिये यांना उमेदवारी देण्यात आली. कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही जोमाने काम केले. परंतु निकाल मात्र पाहिजे तसा समाधानकारक राहिला नाही. उलट लाखापर्यंत मजल मारलेल्या बसपाला यावेळी प्रचंड धक्का बसला. बसापाच्या उमेदवारांना ५० हजाराचा आकडाही गाठता आला नाही. नागपुरातून मोहम्मद जमाल यांनी ३२ हजार मते घेतली, तर रामटेकमधून सुभाष गजभिये यांनी ४२ हजारावर मते घेतली.
१९९१ मध्ये नागपुरात बसपाचे सिद्धार्थ पाटील यांना केवळ १२ हजार १२७ तर रामटेक मध्ये प्रा. मा.म. देशमुख यांना १२ हजार ३९३ मते मिळाली होती. त्यावेळच्या अपक्ष उमेदवारांच्या तुलनेत ही मते बऱ्यापैकी होती. पुढील निवडणुकीत बसपा जोर मारेल, असे अंदाज बांधले जात असताना १९९६ मध्ये बसपाची रिपाइंसोबत युती झाली. युतीत नागपूर व रामटेक या दोन्ही जागा रिपाइंसाठी सोडण्यात आल्या. विशेष म्हणजे या निवडणुकीत रिपाइंच्या उमेदवारांनी भरभरू न मते घेतली. १९९८ मध्ये बसपा पुन्हा स्वबळावर लढली. या निवडणुकीत बसपाची मते दुप्पट झाली. नागपुरातून सिद्धार्थ पाटील यांना २१ हजार ३६२ मते तर रामटेक मधून राम हेडाऊ यांना ३० हजार ९४९ मते मिळाली. ११९८ च्या यशाने बसपा नेते फार्मात होते. तर दुसरीक डे बसपाचे वाढलेले प्रस्थ रिपाइं नेत्यांनाही खटकणारे होते. याचा परिणाम १९९९ च्या निवडणुकीत दिसून आला. १९९९ मध्ये बसपा व रिपाइं एकमेकांपासून चार हात दूर राहिले. दुसरीकडे रिपाइंने काँग्रेसशी ‘हात’ मिळविला. बसपा स्वतंत्ररीत्या लढली. या निवडणुकीत रिपब्लिक न मते बऱ्यापैकी        काँग्रेस- रिपाइंसोबत गेल्याने बसपाचा ग्राफ घसरला.
१९९८ च्या तुलनेत बसपाला जवळपास निम्मीच मते मिळाली. नागपुरात प्रा. पी.एस. चंगोले यांना १४ हजार ४६५ तर रामटेक मध्ये अशोक इंगळे यांना १६ हजार ७०६ मतांवर समाधान मानावे लागले. बसपासाठी कमी झालेली मते हा एक मोठा धक्का  होता. पुढील पाच वर्षे बसपाचे ‘कॅडर’ संघटन वाढीच्या कामाला लागले. उमेदवारीचे निकषही बदलले गेले. २००४ मध्ये नागपुरातून जयंत दळवी तर रामटेक मधून प्रा. चंदनसिंग रोटेले यांना रिंगणात उतरवण्यात आले.
दोन्ही मतदारसंघात बसपाच्या उमेदवारांनी पहिल्यांदा ५० हजार मतांचा पल्ला गाठला. दळवी यांना ५७ हजार २७ व रोटेले यांना ५५ हजार ४४२ मते मिळाली. २००९ च्या निवडणुकीत बसपाने नागपुरात सोशल इंजिनिअररिंगचा प्रयोग केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष व तेली समाजात प्रस्थ असलेले माणिक राव वैद्य यांना उमेदवारी दिली. या वेळी बसपाने पहिल्यांदा १ लाखाचा पल्ला ओलांडला. वैद्य यांना १ लाख १८ हजार ७४१ मते मिळाली व बसपा तिसऱ्या क्रमांकावर पोहचली. रामटेक अनुसूचित जातीसाठी राखीव होते. येथे प्रकाश टेंभूर्णे रिंगणात उतरले. मतदारांना फारसे परिचित नसलेले टेंभूर्णे यांनी चक्क ६२ हजार २३८ मतांवर मजल मारली होती.

 

Web Title: The movement of elephants in Nagpur-Ramtek slowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.