Lok Sabha Election 2019; वयोमान नव्वदी पार, मतदानाचा उत्साह मात्र अटकेपार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:13 AM2019-04-11T10:13:27+5:302019-04-11T10:14:02+5:30

मतदानाचा हक्क बजावण्याचे महत्त्व जाणलेल्या वयोवृद्ध पिढीने उन्हातान्हाची किंवा दुखण्याबिखण्याची पर्वा न करता सकाळी मतदान केले.

Lok Sabha Election 2019; Over 90 years of age, voting enthusiasm ... | Lok Sabha Election 2019; वयोमान नव्वदी पार, मतदानाचा उत्साह मात्र अटकेपार...

Lok Sabha Election 2019; वयोमान नव्वदी पार, मतदानाचा उत्साह मात्र अटकेपार...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मतदानाचा हक्क बजावण्याचे महत्त्व जाणलेल्या वयोवृद्ध पिढीने उन्हातान्हाची किंवा दुखण्याबिखण्याची पर्वा न करता सकाळी मतदान केले. नागपुरातील मनपा टाऊन हॉल येथे नव्वदी गाठलेल्या निर्मला चितळे या आजीबाईंनी मतदान केले. तर अजनी येथील मतदान केंद्रावर प्रशांतनगर येथे राहणाऱ्या मंगला मोरेश्वर देसाई या ९५ वयोमानाच्या महिलेने मतदान केले. भंडारा जिल्ह्यातील आसगाव येथील मतदान केंद्रावर ९० वर्षांच्या ऋषी धोंडू डोये यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी व्हिल चेअरवर केंद्रावर आणले होते. याच तºहेने विदर्भातील अन्य मतदान केंद्रांवरही मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केले आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Over 90 years of age, voting enthusiasm ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.