Lok Sabha Election 2019; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आई व पत्नीसोबत केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:46 PM2019-04-11T12:46:28+5:302019-04-11T12:47:36+5:30

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आई सरिता व पत्नी अमृता यांच्यासमवेत लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Election 2019; Chief Minister Devendra Fadnavis voted with mother and wife | Lok Sabha Election 2019; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आई व पत्नीसोबत केले मतदान

Lok Sabha Election 2019; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आई व पत्नीसोबत केले मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आई सरिता व पत्नी अमृता यांच्यासमवेत लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. नागपुरात सकाळी सात वाजता सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले होते. त्यानंतर भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी पत्नी व कुटुंबियांसह मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले होते. मुख्यमंत्री मतदानासाठी केव्हा येणार याबाबत नागरिकांत उत्सुकता होती. अखेरीस दुपारी बारानंतर मुख्यमंत्री आपल्या आई व पत्नीसह मतदान केंद्रावर पोहचले व त्यांनी मतदान केले.
नागपुरात उन्हाचा तडाखा जाणवतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील तापमान ४० अंशाहून अधिक नोंदविले जात आहे. दुपारच्यावेळी बाहेर पडणे दुरापास्त झाले आहे. मात्र या उन्हाची फिकिर न करता नागरिक मोठ्या संख्येने मतदान करताना दिसत आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019; Chief Minister Devendra Fadnavis voted with mother and wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.