स्ट्राँग रुमसाठी अग्निशमनची यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:41 PM2019-04-15T23:41:25+5:302019-04-15T23:42:31+5:30

नागपूर व रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रासाठी ११ एप्रिलला मतदान झाले. मतदानानंतर दोन्ही लोकसभा क्षेत्रातील ईव्हीएम मशीन कळमना मार्केट येथील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. दोन वेगवेगळ्या गोदामात या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफची मदत घेण्यात आली आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती वा आगीपासून वेळीच बचाव व्हावा, यासाठी अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली आहे.

Fire fighting machinery ready for the Strong Room | स्ट्राँग रुमसाठी अग्निशमनची यंत्रणा सज्ज

स्ट्राँग रुमसाठी अग्निशमनची यंत्रणा सज्ज

Next
ठळक मुद्देदोन फायर टेंडर २४ तास व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रासाठी ११ एप्रिलला मतदान झाले. मतदानानंतर दोन्ही लोकसभा क्षेत्रातील ईव्हीएम मशीन कळमना मार्केट येथील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. दोन वेगवेगळ्या गोदामात या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफची मदत घेण्यात आली आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती वा आगीपासून वेळीच बचाव व्हावा, यासाठी अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली आहे.
कळमना येथील स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी गंजीपेठ व कॉटन मार्केट येथील अग्निशमन केंद्रांचे दोन फायर टेंडर २४ तास सज्ज ठेवण्यात आले आहे. दोन वाहनांसोबत एक उपअग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक, विमोचक, एक चालक, एक यंत्र चालक व दोन अग्निशामक विमोचक तीन पाळ्यात तैनात करण्यात आले आहेत. फायर टेंडरमध्ये पाण्यासोबतच आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेली अन्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे .
आग नियंत्रणासाठी ४ किलो क्षमतेचे १० नग एबीसी स्टोर पे्रशर फायटर एस्टिंग्युशर लावण्यात आले आहे. तसेच अग्निशमन विभागाने जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून स्ट्राँग रुम परिसरात अस्थायी स्वरूपात उभारण्यात आलेल्या तंबूचे कापड अग्निरोधक असावे, वीजतारा, अस्थायी वायरिंग, प्रकाशव्यवस्था शासन मान्यताप्राप्त कंत्राटदाराच्या माध्यमातून करावी, असे निर्देश दिले आहेत. संबंधित मंडप व वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्देश देण्याची गरज आहे. २३ मे रोजी मतमोजणी होत असल्याने स्ट्राँग रुम परिसरात सुरक्षा व्यवस्था, आग व नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन कळमना गोदामात आणण्यात आल्या. सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेत या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत.
स्ट्राँग रुम अंधारात
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दोन्ही लोकसभा मतदार क्षेत्रासाठी दोन वेगवेगळ्या स्ट्राँग रुम बनविण्यात आल्या आहे. यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे. जेथे ईव्हीएम आहेत, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वायरिंग नाही. वायरिंग नसल्याने अंधार आहे. त्यामुळे आग लागण्याचा धोका कमी होतो. सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मुख्य गोदाम सीआरपीएच्या सुरक्षेत आहे. दुसऱ्या घेऱ्याची जबाबदारी राज्य राखीव दलाकडे असून परिसरातील सुरक्षेची जबाबदारी कळमना पोलिसांकडे आहे.

Web Title: Fire fighting machinery ready for the Strong Room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.