पुस्तकात न दिसलेले पु. ल. देशपांडे 'भाई'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 10:56 AM2019-01-05T10:56:10+5:302019-01-05T11:15:06+5:30

भाई म्हणजेच पु ल देशपांडे या नावातच मोठेपण दडले आहे आहे. भाईंनी शिक्षक, नाटक, चित्रपट, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात कार्य केले. संपूर्ण महाराष्ट्रात लेखक, नाटककार, कलाकार म्हणून ते प्रसिद्ध होते.

What we dint find in P.L .Deshpande books you find in movie 'Bhai' | पुस्तकात न दिसलेले पु. ल. देशपांडे 'भाई'मध्ये

पुस्तकात न दिसलेले पु. ल. देशपांडे 'भाई'मध्ये

googlenewsNext
ठळक मुद्दे भाई या चित्रपटातून त्यांच्यातील सामान्य माणूस दाखवला आहेया चित्रपटाच्या माध्यमातून भाईंच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे

भाई म्हणजेच पु ल देशपांडे या नावातच मोठेपण दडले आहे आहे. भाईंनी शिक्षक, नाटक, चित्रपट, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात कार्य केले. संपूर्ण महाराष्ट्रात लेखक, नाटककार, कलाकार म्हणून ते प्रसिद्ध होते. परंतु भाई या चित्रपटातून त्यांच्यातील सामान्य माणूस दाखवला आहे. असे विचार भाई चित्रपटाच्या कलाकारांनी लोकमतला भेट देऊन व्यक्त केले. यावेळी दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता सागर देशमुख, ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी, वायाकॉम १८ मोशन पिक्चर्सचे बिझनेस हेड निखिल साने आदी उपस्थित होते.

महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन 
लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे पु. ल. देशपांडे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण होते. आजवर त्यांच्या साहित्यकृतींवर अनेक चित्रपट,नाटके प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. परंतु आता खुद्द पुलंच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक महेश मांजरेकर आहे

सागर देशमुख पु.ल.देशपांडे यांच्या भूमिकेत   
या चित्रपटाच्या माध्यमातून भाईंच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सागर देशमुख पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. तर इरावती हषेर्ने सुनिताबाईंची भूमिका साकारली आहे. भाई:  व्यक्ती की वल्ली' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून पु. ल. देशपांडे यांच्या चाहत्यांनी चित्रपट पाहण्यास  केल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे
   
महेश मांजरेकर म्हणाले, भाई म्हणजे पूल देशपांडे यांच्या नाटक, पुस्तक या गोष्टीतून त्यांना जाणून घेण्यास सुरुवात केली. पूलची बायोग्राफी पाहणे, पुस्तके वाचणे, त्यांच्या नातेवाईकांना भेटणे या सर्वांतून त्यांचे व्यक्तिमत्व अनुभवले. मुंबईत पु ल ची तीन घरे आहेत. तर इतर राज्यातही त्यांची घरे आहेत या घरांची पाहणी केली. ते एक जागी कधीही स्थिर नव्हते. त्यामुळे बेळगाव, रत्नागिरी अशा ठिकाणाची जुनी घरे शोधून काढली. अनेक नाट्यगृहात प्रयोग केले आहेत. लोकांमध्ये मिसळणे तसेच कोणालाही कमी अधिक न समजणे. असा त्यांचा स्वभाव सवार्ना आवडत होता. चित्रपटातून अभिनयाच्या पलीकडचे आयुष्य दाखवले आहे. त्यांची बालगंधर्व, भीमसेन, सर्वांबरोबर जमणारी मैफिल दाखवणे गरजेचे वाटले. पु ल कशातच कधी अडकले नाहीत. ते कोणत्याही व्यक्तीवर कधी चिडत नव्हते. पुलंच्या आठवणी अविस्मरणीय आहेत. एक माणूस, फकीर म्हणून जगत राहिले. त्यांचे मन अतिशय मोठे असल्याने कधीही पैशाचा विचार केला नाही. लहानपणापासून ते दिवंगत होइपर्यंतचा काळ दाखवला आहे. आमच्या डोक्यात पुलंची २० भागांची वेब करण्याचा विचार होता. 

सागर देशमुख म्हणाले, मला असं वाटत नाही की महाराष्ट्रात कोणालाही पुलंबद्दल माहिती नसेल. त्यांनी सर्व क्षेत्रात काम केले हा माज्यासाठी विलक्षण अनुभव आहे. लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुलं ला जाणून घेण्यास सुरुवात केली.  सगळ्यांनी सांगितलं की पुलंची भूमिका करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. माधवी पुरंदरे, सुभाष अवचट अशा दिगग्ज लोकांकडून टिप्स घेतल्या. सुरुवातीला पुलंना जाणून घेणे हे मोठे आव्हान होते. पण त्यांची नाटके, पुस्तके पहिली. स्वत:ला त्यांच्यामध्ये गुंतवत गेलो. पुलंच्या आयुष्यातील एक सामान्य माणूस मी परखडपणे मांडला आहे. पूर्वी पुलंना खूप लोकांनी साकारले आहे. पण  मी त्यांच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयन्त केला आहे.

विद्याधर जोशी म्हणाले, भाई या चित्रपटात अण्णा कर्वे या पात्राची भूमिका केली आहे. या भूमिकेतून एक वर्णनात्मक पात्र साकारले आहे. या पात्राच्या भाषेचा उत्तम प्रकारे वापर केला आहे. चित्रपटाला यामधून वेगळाच आधार मिळाला आहे.

Web Title: What we dint find in P.L .Deshpande books you find in movie 'Bhai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.