Valentine's Day Special Video : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरच्या अविस्मरणीय क्षणांची छोटीशी झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 11:00 AM2019-02-14T11:00:11+5:302019-02-14T11:00:30+5:30

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकरचा नुकताच साखरपुडा पार पडला.

Valentine's Day Special Video: Little glimpse of unforgettable moments of Siddhartha Chandekar and Mitali Mayekar | Valentine's Day Special Video : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरच्या अविस्मरणीय क्षणांची छोटीशी झलक

Valentine's Day Special Video : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरच्या अविस्मरणीय क्षणांची छोटीशी झलक

googlenewsNext

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकरचा नुकताच साखरपुडा पार पडला. आता हे दोघे लग्नबेडीत कधी अडकणार, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र मागील वर्षी व्हॅलेन्टाइन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. यंदाच्या व्हॅलेन्टाइन डेच्या निमित्ताने त्या दोघांनी साखरपुड्याच्या वेळचे अविस्मरणीय क्षण आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. 

सिद्धार्थ व मितालीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर साखरपुड्याच्या वेळीच्या अविस्मरणीय क्षण शेअर केले आहेत. सिद्धार्थने व्हिडिओ शेअर करीत लिहिले की असं घडलं सगळं. एक छोटीशी झलक. या व्हिडिओत त्या दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे. 

तर मितालीने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत लिहिले की, नशीबाने भेटलो. तुझी मैत्रिण बनणे ही माझी पसंती होती. पण तुझ्या प्रेमात पडणे हे माझ्या संयमाच्या पलिकडे होते. हॅप्पी व्हॅलेंटाइन डे. 


काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि मिताली दोघेही गोव्यात सध्या एकत्र वेळ घालवत असून सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळाले होते. याच स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले. तसेच सोशल मीडियावर सतत ते आपले फोटो शेअर करीत असतात. 


याआधी सिद्धार्थ आणि शनाया फेम रसिका यांच्यातील प्रेमाची चर्चा होती. सिद्धार्थ आणि रसिका कायमच एकत्र पाहायला मिळायचे. कोणताही कार्यक्रम असो, कॉफी घेणे असो किंवा मग सिनेमाला जाणं असो दोघंही त्याचे फोटो रसिकांसह सोशल मीडियावर शेअर करत. मात्र दोघांमध्ये काही तरी बिनसल्याची सध्या चर्चा होती.

याच दरम्यान सिद्धार्थच्या आयुष्यात मितालीने एंट्री घेतली. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत गेल्याचे पाहाला मिळाले होते. 

Web Title: Valentine's Day Special Video: Little glimpse of unforgettable moments of Siddhartha Chandekar and Mitali Mayekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.