तेजस्विनी पंडितचे ग्लॅमरस फोटोशूट,दिसला बोल्ड इन ब्लॅक अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 11:24 IST2018-07-06T11:21:59+5:302018-07-06T11:24:59+5:30

तिच्या या फोटोंना खूप लाईक्स आणि भरभरून कमेंटसही मिळाल्याचे पाहायला मिळतं.या फोटोवरही चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.

Tejaswini Pundit's Glamorous Photoshoot,Catches Eyeball Of Everyone | तेजस्विनी पंडितचे ग्लॅमरस फोटोशूट,दिसला बोल्ड इन ब्लॅक अंदाज

तेजस्विनी पंडितचे ग्लॅमरस फोटोशूट,दिसला बोल्ड इन ब्लॅक अंदाज

मनमोहक आणि आकर्षक स्टाइलने सा-यांचीच मने जिंकलेली आणि अभिनयासह तिच्या ट्रेडिशनल असो किंवा बोल्ड अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडीत. आता पुन्हा एकदा तेजस्विनीचा असाच एक हॉट फोटो समोर आला आहे.तेजस्विनीचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. सोशल मीडियावर ग्लॅमरस,ट्रेडिशन अशा वेगवेगळ्या लूकमधले  तेजस्विनीचे फोटो पाहायला मिळतात. तिचा ट्रेडिशन ते वेस्टर्न प्रत्येक अंदाज चाहत्यांना भावतो.तिच्या या फोटोंना खूप लाईक्स आणि भरभरून कमेंटसही मिळाल्याचे पाहायला मिळतं.या फोटोवरही चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर होतोय.तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. 

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या काही मोजक्याच सेलिब्रिटींमध्ये तेजस्विनीचे नाव आहे.सोशल मीडियावरही तेजस्विनी पंडितच्या फॉलोअर्सने  लाखांचा टप्पा ओलांडला आहे.सोशल मीडियावर तब्बल 2 लाखांहूनही अधिक फॉलोअर्स असल्याचे पाहायला मिळते.तसेच अभिनया व्यतिरिक्त तेजस्विनी गेली अनेक वर्षे ममता फॉउंडेशन ह्या HIV बाधित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी जोडली गेली आहे. हि भारतातली एकमेव संस्था आहे जी HIV बाधित लहान मुलांसाठीच हक्काचं घर आहे. केवळ आर्थिक सहाय्य करणे इथवर तेजस्विनीचे काम सीमित नाही. कामात कितीही व्यस्त असली तरीही वेळात वेळ काढून ती या मुलांना  भेटत असते. त्यांच्यासोबत चित्रपट पाहणे, त्यांना शॉपिंगला घेऊन जाणे, त्यांच्यासोबत लंच करणे यांसारख्या अनेक गोष्टी ती या मुलासांसाठी करते.  

अभिनयाशिवाय काही तरी हटके करण्याचा प्रयत्नही तेजस्विनीने  केला आहे.अभिज्ञा भावेसह तिने स्वतःचे फॅशन ब्रँड तयार केले आहे.काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून तेजाज्ञा या फॅशन ब्रँडची सुरुवात केली आहे. भारतीय महिला वस्त्रांमधील आभूषण म्हणजेच साडी. साडीला अनोख्या रुपात सा-यांसमोर आणणा-या एक पाऊल पुढे टाकत या दोन्ही नायिकांनी वेस्टर्न कपड्यांना पारंपरिक लूक दिला आहे. त्यांचे नवे कलेक्शन बाजारातही आणले आहेत.दीपिका पादुकोण, आलिया भट, श्रद्धा कपूर, कंगणा राणौत, सोनम कपूर, शिल्पा शेट्टी, बिपाशा बासू, हृतिक रोशन, जॉन अब्राहम यांनी आपापले फॅशन ब्रँड्स आणून फॅशन डिझायनर बनले आहेत. मात्र आता बी-टाऊन प्रमाणेच यांत आपल्या मराठी नायिकाही मागे नाहीत असेच यावरून सिद्ध होते.
 

Web Title: Tejaswini Pundit's Glamorous Photoshoot,Catches Eyeball Of Everyone