शर्वरी गायकवाडचे विजय पाटकर यांनी ह्या शब्दात केले कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:56 PM2018-12-11T16:56:31+5:302018-12-11T16:57:46+5:30

'तेरा दिवस प्रेमाचे' नाटकाचा पंचवीसावा प्रयोग नुकताच माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये पार पडला.

Sharwari Gaikwad's Vijay Patkar praised this word | शर्वरी गायकवाडचे विजय पाटकर यांनी ह्या शब्दात केले कौतूक

शर्वरी गायकवाडचे विजय पाटकर यांनी ह्या शब्दात केले कौतूक

googlenewsNext
ठळक मुद्दे'तेरा दिवस प्रेमाचे' नाटकाने केले २५वा प्रयोग पूर्ण


'तेरा दिवस प्रेमाचे' नाटकाचा पंचवीसावा प्रयोग नुकताच माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये पार पडला. या प्रयोगाला अभिनेते विजय पाटकर व निर्माते नानूभाई जयसिंघानी यांनी उपस्थिती लावली होती. 
सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या 'तेरा दिवस प्रेमाचे' या नाटकाने नुकताच रौप्य महोत्सवी २५वा प्रयोग पूर्ण केला. साधे सरळ नाव पण रोमांचित करणाऱ्या या नाटकाने नुकतेच २५ प्रयोग पूर्ण केल्याबद्दल अभिनेते विजय पाटकर यांनी त्यांचे अभिनंदन केले असून 'प्रिया वझे' ची भूमिका साकारणारी नवोदित अभिनेत्री शर्वरी गायकवाडचे विशेष कौतुक केले. विषय व्यवस्थित सजून त्यानुसार तो अंगीकारून शर्वरीने भूमिका साकारल्यामुळे तिचा अभिनय थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो आणि त्यामुळे ती अजिबात नवोदित अभिनेत्री वगैरे वाटत नसल्याचे विजय पाटकर यांनी सांगितले.
अरुण नलावडे यांनी गेल्या अनेक वर्षांत रंगभूमीवर देखील एकाहून एक हिट नाटकं दिली आहेत. आता ते तेरा दिवस प्रेमाचे या नाटकात ते झळकणार असून या नाटकात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. नाटककार आनंद म्हसवेकर यांचे हे नाटक असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. म्हसवेकर हे मागील अनेक वर्षं एकांकिका, हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक, निर्माते म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तेरा दिवस प्रेमाचे या नाटकाद्वारे एक गंभीर विषयी त्यांनी अतिशय विनोदी पद्धतीने मांडला आहे.
‘प्रयोग फॅक्टरी’ निर्मित व ‘जिव्हाळा’ प्रकाशित या नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर यांनी केले असून, शिरीष राणे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. अनुराधा सामंत या नाटकाच्या निर्मात्या आहेत. संदेश बेंद्रे यांनी या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे. मयुरेश माडगांवकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. तर विनय आनंद यांची प्रकाशयोजना आहे. कार्यकारी निर्माता म्हणून विनय म्हसवेकर हे काम पाहात आहेत. अरुण नलावडे यांच्यासह माधवी दाभोळकर, संजय क्षेमकल्याणी, शर्वरी गायकवाड, मेघना साने, देवेश काळे आणि संजय देशपांडे हे कलाकार या नाटकात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

Web Title: Sharwari Gaikwad's Vijay Patkar praised this word

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.