Sai Tamhnakar Unseen! Glamorous Avatar | सईचे हे फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, सौंदर्य, अदा आणि स्टाइलचा सुरेख मिलाप
सईचे हे फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, सौंदर्य, अदा आणि स्टाइलचा सुरेख मिलाप

सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. मराठी सिनेसृष्टीतल्या या ग्लॅमरस अभिनेत्रीने हटके स्टाईल करत नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ग्लॅमरस अंदाज असलेला सईचे फोटो कुणालाही घायाळ करेल असेच आहेत. या फोटोवर रसिकांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर होतोय. सईचे प्रत्येक अंदाज रसिकांना आवडतो त्यामुळे हा अंदाजही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच पाहायला मिळतोय.

सईने सोशल मीडियापासून काही दिवस दूर असली तरी या फोटोशूटमुळे तिच्या चाहत्यांची प्रतीक्षा चांगलीच फळाला आली आहे. सई सध्या सचिन कुंडलकर दिग्दर्शित पाँडेचेरी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं शुटिंग निसर्गरम्य पाँडेचेरीमध्ये होणार आहे.

या सिनेमात सईसह नैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. सचिन कुंडलकर आणु तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे. 


Web Title: Sai Tamhnakar Unseen! Glamorous Avatar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.