Renuka Shahane, Shahrukh Khan and Sachin Khedekar were photographed viral | ​रेणुका शहाणे, शाहरुख खान आणि सचिन खेडेकर यांचा फोटो झाला व्हायरल

शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग असला तरी त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात ही छोट्या पडद्यावरून केली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सर्कस या मालिकेत काम केले होते. ही मालिका आणि या मालिकेतील शाहरुखची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. सर्कस या मालिकेत रेणुका शहाणे ही शाहरुखची नायिका होती. रेणुकाने देखील छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती मोठ्या पडद्याकडे वळली. हम आपके है कौन या चित्रपटात तिने साकारलेली पूजा ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. रेणुका आणि शाहरुखच्या सर्कस या मालिकेला आज अनेक वर्षं झाली असली तरी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेतील त्या दोघांच्या केमिस्ट्रीची देखील चांगलीच चर्चा झाली होती. शाहरुख आणि रेणुकाची नुकतीच भेट झाली असून रेणुकाने शाहरुख सोबतचा फोटो ट्विटर या तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला रेणुका आणि शाहरुख सोबत सचिन खेडेकर देखील पाहायला मिळत आहे.
सचिन आणि रेणुका यांनी अनेक वर्षांपूर्वी सैलाब या मालिकेत काम केले होते. त्यांची ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत प्रेक्षकांना एक आगळी वेगळी प्रेमकथा पाहायला मिळाली होती. सैलाब ही मालिका त्या काळातील सगळ्या मालिकांपेक्षा खूप वेगळी असल्याने या मालिकेची चांगलीच चर्चा झाली होती. या मालिकेत रेणुकाने शिवानी तर सचिनने रोहित ही भूमिका साकारली होती. एकमेकांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या पण परिस्थितीमुळे वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न करणाऱ्या एका युगलाची कथा सैलाबमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. 
रेणुकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या जुन्या प्रसिद्ध दोन मालिकांमधील सहकलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या फोटोसोबत रेणुकाने एक छानशी पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये रेणुकाने म्हटले आहे की, सर्कस आणि सैलाब एकाच फ्रेममध्ये...
रेणुकाने हा फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या फॅन्सने मोठ्या प्रमाणात या फोटोला लाइक्स दिल्या असून अनेकांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Also Read : आमिर खान ऐवजी आता शाहरूख खान करणार 'या' बायोपिकमध्ये काम 

Web Title: Renuka Shahane, Shahrukh Khan and Sachin Khedekar were photographed viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.