आता स्वप्नील जोशी ही म्हणतोय 'मी पण सचिन'!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 02:16 PM2018-12-18T14:16:27+5:302018-12-18T14:17:32+5:30

'मी पण सचिन' चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, संजय छाब्रिया, निखिल फुटले आणि गणेश गीते या चित्रपटाचे निर्माता असून श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Now Swapnil Joshi says 'I am Sachin'! | आता स्वप्नील जोशी ही म्हणतोय 'मी पण सचिन'!

आता स्वप्नील जोशी ही म्हणतोय 'मी पण सचिन'!

googlenewsNext

"मी पण सचिन" नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका ध्येयवेड्या माणसाची गोष्ट सांगणारा आहे. नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशनल सॉंग चित्रित करण्यात आले. ‘आयला आयला सचिन' असे या जोशमय गाण्याचे बोल असून सचिनच्या फॅन्ससाठी हे गाणे एक पर्वणीच ठरणार आहे. या गाण्यामध्ये स्वप्नील जोशी आणि प्रियदर्शन जाधव दिसत असून एका खेडेगावातील बाजारात हे गाणे चित्रित झाले आहे. बाजार म्हटले, की डोळ्यांसमोर येतात ते भाजीवाले, बॅण्डवाले, वासुदेव, आणि लहान मुले. यांच्यासह सचिनचे भव्य पोस्टरही या गाण्यात झळकत आहेत. पताके, ढोल, ताशे अशा एकंदरच उत्साहपूर्ण वातावरणात गाण्याचे चित्रीकरण झाले आहे.

'आयला आयला सचिन' हे गाणं त्रिनीती ब्रदर्स म्हणजेच हर्षवर्धन वावरे, करण वावरे,आदित्य पाटेकर  यांनी संगीतबद्ध केले असून आदित्य पाटेकर यांनी स्वरबद्ध केले आहे. तर सुजित कुमार यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. आम्ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना या गाण्याद्वारे ट्रिब्युट देणार आहोत आणि त्याचमुळे हे गाणं करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. हे गाणं करताना खूप मजा आली, असे या चित्रपटाचे निर्माता श्रेयस जाधव यांनी सांगितले. तर स्वप्नील म्हणतो, की हा सिनेमा फक्त क्रिकेटवर आधारित नसून आयुष्यावरही तितकाच आधारित आहे. कारण आयुष्य आणि क्रिकेटमध्ये खूप साम्य आहे. क्रिकेट आणि आयुष्यातही पुढच्या क्षणाला काय होईल, याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. 

इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन' चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, संजय छाब्रिया, निखिल फुटले आणि गणेश गीते या चित्रपटाचे निर्माता असून श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. श्रेयश जाधव यांनी या आधीही आपल्या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले आहेत, त्यामुळे या चित्रपटातूनही प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळेल, यात शंका नाही. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार आहे. 

Web Title: Now Swapnil Joshi says 'I am Sachin'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.