Ashok was passionate about the memories of these Marathi artists | ​या मराठी कलाकारांच्या आठवणीने अशोक सराफ होतात भावुक

अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची ७१ वर्षं पूर्ण केली आहेत. ते मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी मराठी सोबतच हिंदी चित्रपटांमध्येदेखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी करण अर्जुन, यस बॉस यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये  दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अशोक सराफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, अशोक सराफ यांच्या मुख्य भूमिका असलेले अनेक चित्रपट गाजले आहेत.
लक्ष्मीकांत, सुधीर जोशी यांनी अशोक सराफ यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. त्यांच्या दोघांचेही विनोदाचे टायमिंग खूप छान होते असे ते सांगतात. या दोघांनाही मी खूप मिस करतो असे अशोक सराफ यांनी सीएनएक्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. तसेच रंजना आणि अशोक सराफ यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी सांगताना अशोक सराफ म्हणाले होते की, मराठी चित्रपटसृष्टीतील त्या खूप चांगल्या अभिनेत्री होत्या. एखादी गोष्ट येत नाही हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीमध्ये नसायचा. प्रत्येक गोष्ट परफेक्ट असले पाहिजे असे त्यांचे म्हणणे असायचे. 
अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकापासून केली आणि पुढे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले. त्यांचे काम प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी तर फार प्रसिद्ध होती. या दोघांची जोडी म्हणजे मनोरंजनाचा डबल धमाकाच असायचा. असा हा डबल धमाका निदान अजून तरी कोणी देऊ शकलेले नाही. विनोदी सिनेमे म्हटले की आपसुकच अशोक सराफ डोळ्यांसमोर येतात. आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ते मराठी सुपरस्टार आहेत. अशोक सराफ यांनी विनोदी तसेच गंभीर भूमिका पण साकारल्या आहेत.

Also Read : या अपघातांमध्ये थोडक्यात बचावले होते अशोक सराफ
Web Title: Ashok was passionate about the memories of these Marathi artists
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.