फिटनेस फ्रिक असलेली अमृता खानविलकरचा 'हा' फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 03:17 PM2019-07-15T15:17:50+5:302019-07-15T15:21:14+5:30

अमृता आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. अभिनय आणि डान्सबरोबच तिला फिटनेसचेही वेड असल्याचे समोर आले आहे.

Amrita Khanvilkar Workout Gym Photo Viral | फिटनेस फ्रिक असलेली अमृता खानविलकरचा 'हा' फोटो व्हायरल

फिटनेस फ्रिक असलेली अमृता खानविलकरचा 'हा' फोटो व्हायरल

googlenewsNext

अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. आता तर तिच्या फिटनेसवरही तिचे चाहते फिदा झाले आहेत. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. त्याच यादीत अमृताचेही नाव सामिल झाले आहे. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे जिममधील व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये अमृता वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. अमृताचा हा व्हिडीओ अनेक चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरणार हे मात्र नक्की. अमृता आपल्या फिटनेसमुळे अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते. अमृता आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. अभिनय आणि डान्सबरोबच तिला फिटनेसचेही वेड असल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान अमृताचे सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ही ती अपलोड करत असून रसिकांची प्रशंसा मिळवताना दिसते. नुकतेच अमृता तिच्या आईसह मालिदिव्हजमध्ये व्हॅकेशनसाठी गेले होते. दोघांनी मस्त क्वॉलिटी टाईम एन्जॉय केला. मालदिव्हज फोटोही अमृताने सोशल मीडियावर अपलोड केले होते. या फोटोलाही रसिकांची पसंती मिळाली होती. 


'नच बलिये' या डान्स रिअॅलिटी शोचे जेतेपद पटकावल्यानंतर तिच्या डान्सने साऱ्यांनाच वेड लावलं. लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल. कारण यांत अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: Amrita Khanvilkar Workout Gym Photo Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.