आस्ताद काळे आणि स्वप्नालीची प्यारवाली लव्हस्टोरी, पाहा स्वप्नालीचा प्रेम व्यक्त करण्याचा हटके अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 08:00 AM2018-12-27T08:00:00+5:302018-12-27T08:00:00+5:30

स्वप्नाली ही प्रत्येक गोष्टीचा मनमुराद आनंद घेणारी मुलगी आहे. त्यामुळेच की काय आस्तादवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तिने हटके मार्ग निवडला.

Aastad Kale and Swapnali's Pyaarwali Lovestory, swapnali shows love for Aastad in different style | आस्ताद काळे आणि स्वप्नालीची प्यारवाली लव्हस्टोरी, पाहा स्वप्नालीचा प्रेम व्यक्त करण्याचा हटके अंदाज

आस्ताद काळे आणि स्वप्नालीची प्यारवाली लव्हस्टोरी, पाहा स्वप्नालीचा प्रेम व्यक्त करण्याचा हटके अंदाज

googlenewsNext

मराठी बिग बॉसमधून अभिनेता आस्ताद काळे याची लव्हस्टोरी जगासमोर आली. अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबतच्या रिलेशनशिपची कबुली त्याने बिग बॉस मराठीमध्ये दिली होती. आस्तादच नाही तर स्वप्नालीनेही हे मान्य केले आहे. एकमेकांवर असलेले नितांत प्रेम व्यक्त करताना ते मागे पुढे पाहत नाही. सामान्यपणे एकमेकांवरील प्रेम दाखवताना कपल्स मिळत्याजुळत्या रंगाचे कपडे परिधान करतात किंवा आपल्या जोडीदाराप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र स्वप्नाली आणि आस्तादची प्यारवाली लव्हस्टोरी थोडी हटके आहे.

स्वप्नाली ही प्रत्येक गोष्टीचा मनमुराद आनंद घेणारी मुलगी आहे. त्यामुळेच की काय आस्तादवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तिने हटके मार्ग निवडला. आस्ताद आणि स्वप्नालीचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत स्वप्नालीने पिळदार  खोट्या खोट्या मिशा लावून आस्तादच्या रिअल मिशांना कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. या खोट्या मिशांमध्ये स्वप्नालीचा लूक एकदम सुंदर दिसत आहे. आपल्या जोडीदारावरील प्रेम व्यक्त करण्याचा स्वप्नालीचा अंदाज लयभारी आणि हटके म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आस्ताद आणि स्वप्नालीने पुढचे पाऊल या मालिकेत त्याच्यासोबत काम केले होते. ते दोघे अनेक वर्षांपासून नात्यात असल्याचे म्हटले जात होते. अखेर मराठी बिग बॉसमध्ये आस्तादने आपल्या प्रेमाची जाहीर कबूली दिली होती. 

Web Title: Aastad Kale and Swapnali's Pyaarwali Lovestory, swapnali shows love for Aastad in different style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.