काँग्रेसला मतदान केल्यास भाजपाला जाते; सुशीलकुमार शिंदेंचीही तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:00 PM2019-04-18T13:00:05+5:302019-04-18T13:06:48+5:30

सकाळी मतदान सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाले आहेत. वेळ वाढवून देण्याची मागणी.

vote goes to Bjp if voted to Congress; Complaint of Sushilkumar Shinde | काँग्रेसला मतदान केल्यास भाजपाला जाते; सुशीलकुमार शिंदेंचीही तक्रार

काँग्रेसला मतदान केल्यास भाजपाला जाते; सुशीलकुमार शिंदेंचीही तक्रार

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान यंत्रांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाने केलेला असतानाच आता कांग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनीही आक्षेप नोंदविला आहे. 


सकाळी मतदान सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाले आहेत. यामुळे मतदान करण्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. तर काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

यावर १४९ व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आले असून आक्षेप घेतलेली यंत्रे ताब्यात घेण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

आपलं मत वेगळ्याच पक्षाला गेलं असं वाटतंय?; फक्त २ रुपयांत करा चॅलेंज, पण....

 

प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांने देखील कपबशीचे बटन दाबल्यास कमळाची लाईट पेटत असल्याचा आरोप केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला. मतदान यंत्रामध्ये घोळ करण्यात आला आहे.  कप बशीचे बटण दाबले जात नाही आणि दाबले गेलेच तर मत कमळाला जात आहे, असा दावा त्यांनी  केला आहे.


सुजात पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनीही मतदान यंत्रात घोळ असल्याचं म्हटलं आहे. मात्र, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
 

Web Title: vote goes to Bjp if voted to Congress; Complaint of Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.