नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींचे सरसेनापती, विक्रमी मतांनी निवडून द्या- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 07:35 PM2024-03-27T19:35:27+5:302024-03-27T19:40:19+5:30

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. सुनील मेंढे यांचे उमेदवारी अर्ज केले दाखल

Devendra Fadnavis praised Nitin Gadkari work in Pm Modi Government and Viksit Bharat Initiative | नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींचे सरसेनापती, विक्रमी मतांनी निवडून द्या- देवेंद्र फडणवीस

नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींचे सरसेनापती, विक्रमी मतांनी निवडून द्या- देवेंद्र फडणवीस

Nitin Gadkari Devendra Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील लोकप्रिय चेहरा असलेले नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर येथे केले. नागपूर मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या विशाल जाहीर सभेत फडणवीस बोलत होते.

"नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींचे सरसेनापती आहेत. गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने केलेले कार्य हा एक ट्रेलर आहे. देशाला विकसित, सामर्थ्यशाली बनवण्यासाठी अजून बरेच काही घडायचे आहे. मोदींजींच्याच नेतृत्वाखाली पुढच्या पाच वर्षांत गरीबीमुक्त, बेरोजगारी मुक्त व समता युक्त भारत घडवायचा आहे. पंतप्रधान मोदींनी २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचा संकल्प केला आहे. त्याची मुहूर्तमेढ पुढच्या पाच वर्षांत रोवली जाणार असून त्यासाठी मोदीजींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे", असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला.

भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनीही बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांची उपस्थिती होती.

Web Title: Devendra Fadnavis praised Nitin Gadkari work in Pm Modi Government and Viksit Bharat Initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.